शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गावितांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, यावर चित्रातली वाघीण शांत का?, शेकापच्या वैशाली सूर्यवंशी यांचा सवाल

By संदीप आडनाईक | Updated: August 23, 2023 18:22 IST

कोल्हापूर : 'मासे खाणाऱ्या महिला चिकन्या दिसतात, त्यांचे डोळे सुंदर होतात, अशा महिलांना पटवणे सोपे जाते' असे आक्षेपार्ह विधान ...

कोल्हापूर : 'मासे खाणाऱ्या महिला चिकन्या दिसतात, त्यांचे डोळे सुंदर होतात, अशा महिलांना पटवणे सोपे जाते' असे आक्षेपार्ह विधान आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी॓॓ केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची  मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. यावर चित्रातली वाघीण शांत का? यावर त्यांनी आवाज उठवला पाहिजे असाही सवाल त्यांनी केला आहे.आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. ज्या महिला मासे खात नाहीत त्या कुरूप दिसतात असा याचा अर्थ होतो. दुर्गम भागातील महिलांना अजूनही आरोग्य विषयी सुविधा मिळत नाहीत काही महिला अजूनही शारिरीक स्वास्थ्याबाबत अज्ञानी आहेत, त्या गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून नको त्या गोष्टींवर मंत्री ज्ञान पाजळत आहेत असा आरोप त्यांनी केला. महिलांना पटवण्याची भाषा करणाऱ्या वाचाळवीर आदिवासी विकास मंत्री गावित यांनी महिलांचा अपमान केला असून महिला आयोगाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशीही मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVijaykumar Gavitविजय गावीत