शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

वंचितांच्या शिक्षणासाठी विद्यामंदिर, कामेवाडी

By admin | Updated: July 10, 2015 21:43 IST

--गुणवंत शाळा

गोवा, कोकण व कर्नाटकच्या सीमेवर विसावलेला चंदगड तालुका. निसर्गसंपन्न डोंगर रांगातील गर्द वनराई, हिरवीकंच शिवारं आणि त्यात वसलेलं कामेवाडी हे गाव. गावात लोकवस्ती अवघी ८२१ आणि मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळा आहे. सहा शिक्षक ज्ञानदानात कार्यरत आहेत. प्रशस्त इमारत आहे. स्वच्छ परिसर, खेळाचे पुरेसे मैदान, कडेला झाडे व हिरवे कंपौंड आहे. शाळेची विद्यार्थीसंख्या १६६ आणि विशेष म्हणजे मुलींची संख्या ९२ व मुले ७४ आहेत. या शाळेत अनुसूूचित जमातीची ११३, विमुक्त जमाती ४४, अनुसूचित जाती ४, इतर मागास ३ आणि बिगर मागास २ असे विद्यार्थी आहेत. याचाच अर्थ वंचित, उपेक्षित, मागास समाजातल्या मुलांना शिक्षणाची ओढ लावणं हा आहे. त्यांना शाळेत येणे व शिकण्याची ओढ लागली आहे. अज्ञानाचा अंधार आणि शिक्षणाची वानवा असलेल्या कुटुंबातील ही मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत, ती शिक्षकांनी लावलेला जिव्हाळा, आपुलकी आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळेच. भाषा कन्नड, संस्कृती जरासी वेगळी, मोलमजुरी करणारे पालक, शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेली कौटुंबिक स्थिती. तरीही या अडथळ्यांची तमा न बाळगता या शाळेतील शिक्षकवृंद शैक्षणिक वातावरण, आनंददायी अध्यापन पद्धती, नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन, आगळे-वेगळे भिंतीफलक, बाहेरचे अनुभव देणाऱ्या क्षेत्रभेटींच्या कार्यक्रमातून शिक्षणाची ओढ टिकवून ठेवत आहेत. या शाळेत मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. ‘लेक वाचवा’ हा संदेश येथे पाळला जात आहे. मुलींचे लेझीम पथक सुरेख व लयबद्ध आहे. शाळेतील परिपाठ वाद्यवृंदासह नियमित घेतला जातो. मुली ‘लीड’ करतात. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा, खेळ स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुली पाहून उद्याचा भारत ‘स्वयंसिद्ध’ अशा महिलांचा आहे याची चाहूल लागल्यासारखेच वाटले. समूहगीत, नाट्यीकरण, कथाकथन स्पर्धेत केंद्र स्तरावर व बीट स्तरावर प्रथम क्रमांक व समूहनृत्यात द्वितीय क्रमांक मिळविला. जनरल चॅम्पियनशिप स्पर्धेत आणि जिल्हा स्तरावर लगमव्वा नाईक हिची लांबउडी व उंचउडीसाठी निवड झालेली आहे. शाळेत बौद्धिक, शारीरिक विकास तसेच मनोरंजनात्मक स्पर्र्धांचे आयोजन केले जाते. शालेय मंत्रिमंडळाची निवड करून कार्यक्रमांचे नियोजन आणि त्याचे आयोजन विद्यार्थ्यांकडेच सोपविले जाते. तेही अत्यंत हिरिरीने सर्व काही करतात. मराठीमध्ये बोलायला मुलं शिकलीत; पण हेल वा टोन जरा कन्नडला धरूनच आहे. शिक्षण विस्तार अधिकारी हालबागोळ, मुख्याध्यापिका धबाले यांचे मार्गदर्शन आणि देसाई गुरुजी उत्साही, संगीतात वाद्य वादनात रस असणारे गावडा व चोपडा हे शिक्षक, खरे तर सहा शिक्षक आपल्यापरीने उत्कृष्ट ते देण्याचा तळमळीने प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच भाषा भिन्न असलेली, सामाजिक वंचितता पूर्वीही सोसलेली आणि गरिबीची सवय करून घेतलेली ही मुलं येथे आवडीने शिकतात. त्यांच्यातील शिक्षणाची सुप्त इच्छा व ऊर्जा वाढविण्याचे कामे शिक्षक करतात. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया लक्षणीय व कौतुकास्पद आहे. कामेवाडी विद्यामंदिर शाळेतही ६२५ पुस्तके आहेत. ती वाचनाची आवड निर्माण करणारी ठरली आहेत. ‘कामेवाडी गाव छोटं; पण विद्यामंदिराचं शिक्षण मोठं’. शिक्षणाचा गजर या वाडीतून चार वाडीवस्तींवर पोहोचतो आहे आणि म्हणूनच मुलं शाळेच्या ओढीनं हजर होताहेत. - डॉ. लीला पाटीलशाळेची वैशिष्ट्येमुलांना मराठीतून शिकवायचं ही जिद्द पालकांची व शिक्षकांबद्दलही तसा विश्वास त्यांच्या मनात आहे. सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत शिक्षक व विद्यार्थी शाळेत असतात. एखादा आजारी असेल, तर शिक्षक मोटारसायकलवरून त्याला त्याच्या गावातल्या घरापर्यंत सोडतात आणि आणतात. ‘पर्यावरण राखा, वृक्षतोड टाळा’ ही संदेश देणारी वृक्षदिंडी, फलकांवर सुविचार, उचित घोषणा व लिखित वाक्ये शाळा, घरांच्या भिंंतीवर, तसेच दळप गिरणी, कार्यालये, दुकाने व टपरीवर दिसून येतात. बालसभा, वक्तृत्व, निबंध व रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात. ‘नव्या युगाच्या आम्ही रागिणी’ याचे सादरीकरण महिला दिनानिमित्त करण्यात आले. त्याला मातांनी हजेरी लावली व त्यांचे कौतुक केले. तालुका स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनात मुलं सहभागी होतात. मुलांनीच केलेले आणखीही काही मातीकाम, कातरकाम, बांबूकाम, शाडूकाम तसेच विणकामाचे नमुने पाहायला मिळाले. किचन शेडसाठी दहा बाय दहाची जागा परशराम पाटील यांनी शाळेला दिलेली आहे. लोकवर्गणी आणि सहभागातून ८०,००० रुपये जमले आहेत. त्यातून ई-लर्निंग प्रोजेक्ट खरेदी करणार आहोत.शिक्षकांचे परस्परांमधील सामंजस्य, टीमवर्क म्हणून काम करण्याची पद्धत, शिस्त व नियमांचे पालन करण्याची वृत्ती, विद्यार्थीकेंद्रित कार्यक्रम यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे.