शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विद्यामंदिर हलसवडे : सर्वांगीण शिक्षणाचा आनंद--

By admin | Updated: July 3, 2015 00:53 IST

गुणवंत शाळा

हलसवडे (ता. करवीर) येथील विद्यामंदिर शाळेचा आवार प्रशस्त असून क्रीडांगण, इमारत भव्य आहे. स्वच्छतेमुळे ती भौतिक सुविधेतून विद्यार्थ्यांचे मन रमविणारी वाटते. कंपाऊंड घालण्यासाठी आता लोकसहभागातून पैसे उभा करण्याचे प्रयत्न होत आहेत. विद्यार्थीसंख्या २३६ व त्यामध्ये मुलांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे. पटसंख्येबाबत शिक्षकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसली नाहीच, हेच तर या शाळेचे सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेचे द्योतक आहे.गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला ५०० रुपये कन्यादान देण्यासाठी सर्व शिक्षक आर्थिक योगदान करतात. हे कन्यादान आगळे-वेगळे आहे. पालक व शिक्षक यांच्या सुसंवादातून खूपच कामे मार्गी लागली आहेत. पालक मेळाव्याला लेखी छापील निमंत्रण देण्याची प्रथा पाळणारी शाळा व पालकांची उपस्थितीही दमदार आहे. शिष्यवृत्तीचे जादा तास मे महिन्यापासून सुरू होतात. सुटीत मुलांसाठी संस्कार शिबिर घेतले जाते. गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता विषयांची चाचणी घेण्यावर भर देणारी ही शाळा यासाठी ई-लर्निंग, कॉम्प्युटरचा वापर करते. मुलांना त्यामुळे अध्ययनात गोडी वाटते. शिक्षकांकडे लॅपटॉपही आहेत. त्यामुळे अध्ययनसुद्धा आनंददायी व गुणवत्तेचे होत आहे.प्रसाद वडार हा तिसरीतला हुशार मुलगा. त्याला हाडाचा टी.बी. असल्याचे निदान झाले. मानवता व संवेदनशीलता यांचे संस्कार झाल्याने मुलांनी खाऊचे, वाढदिवसाचे पैसे जमवले. शिक्षकांनी १५ हजारांपर्यंत रक्कम उभी केली. अडाणी व गरीब पालक; पण मुख्याध्यापकाने त्या मुलास घेऊन जे. जे., सायन, मुंबई हॉस्पिटल गाठले. कोल्हापूरचे सी.पी.आर.चे वैद्यकीय अधिकारी, नागरिक, पत्रकार, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने त्या मुलावर उपचार सुरू झाले. आता प्रसाद रिकव्हर होतोय. अधूनमधून शाळेत येतोय. तन-मन-धनाने पुढे आलेले विद्यार्थी व त्याहीपेक्षा अशी शिकवण देणारे शिक्षक व त्यांचे नेतृत्व करणारे मुख्याध्यापक आहेत.विशेष उपक्रम म्हणजे गांडूळ खत प्रकल्प. विद्यार्थी राबतात नव्हे आनंदाने स्वत:ला हरवून घेऊन हरखून जातात या कामात. शिक्षकांचे मार्गदर्शन आहे. २०० किलो खत मिळते ते शाळेसमोर व मागील बाजूच्या झाडा-झुडपांना, वेली-वृक्षांना घातले जाते. आजच्या जमान्यात गांडूळ खत, केरकचरा साठविण्यासाठी खड्डा व कुजवून खत तयार करण्याचे महत्त्व व मोल किती आहे, हे मुले-मुली शालेय वयातच या शाळेतून शिकत आहेत. शैक्षणिक उठाव एक लाख रुपयांचा. त्याचा वापर संगणक खरेदी व उरलेले पैसे कंपाऊं ड वॉलसाठी. योगासने म्हणजे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याबद्दल दक्ष असण्याची शिकवण व प्रत्यक्ष कृतिशील बनविण्याचा आदर्श पाठ देणारी ही शाळा. भावनिक विकास व वाढ करणारे भाषण, निबंध, ड्रॉर्इंग आणि सामाजिक कौटुंबिक समस्येवरची पथनाट्ये व नाटुकली स्वगत हे तर चालू आहेच. तशा आशयाची पुस्तकेही ग्रंथालयात पाहायला मिळाली.प्रत्येक वर्गात सुई, दोरा, बटनं, नेलकटर, कंगवा मुलं-मुली दक्षपणे वापरतात, त्यामुळे नीटनेटके राहण्याचे वळण लावले आहे. या वस्तू ठेवण्याच्या कल्पकतेतून, वस्तू-चोर नाही सापडत नि नासधूस, खराबी होत नाही. किती जबाबदारीची जाणीव, नकळत मूल्य-शिक्षणाची शिकवण दिली जाते. शाळेत हास्यक्लब असून, शिक्षक व विद्यार्थी एकत्र येऊन हा आनंद घेतात. ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चा प्रारंभ या उपक्रमामुळे झाला. हास्यक्लबचा उपक्रम आनंद, उल्हास, मनोबुद्धीला चालना देणारा. विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचा बौद्धिक व भावनिक विकास आनंददायी पद्धतीने वाटचाल करीत राहील, हा विश्वास!- डॉ. लीला पाटीलशाळेची वैशिष्ट्येसंगणक कक्ष, प्रयोगशाळा, डिजिटल व्हरांडा, बोलक्या पताका हे शिक्षणाच्या गुणवत्तावाढीचे प्रयत्न दर्शविणारे चित्र दिसते. हलसवडे विद्यामंदिर शाळा कणेरी मठाने दत्तक घेतली आहे. शाळा सुधार योजनेखाली गरजेनुसार शाळेला वस्तू दिल्या जातात. एलसीडी व संगणक दिला आहे.‘लोकमत’मधील ‘संस्काराचे मोती’ मधील कात्रणाचा संग्रहही या शाळेत पाहायला मिळाला. तो मुलीने केला. अन्य काही मुलींनीही अशी प्रेरणा घेतली आहे.ई-लर्निंग, इंटरनेट, स्क्रीन, प्रोजेक्टरच्या वापरासाठी मुलांना मोकळीक देणारे मुख्याध्यापक व शिक्षक, रिपेरिंगचा खर्च त्यांच्याच खिशातून. आई हे हस्तलिखित अगदी भावनिक आणि मुला-मुलींनी व्यक्त केलेल्या शब्दरूपातील भावना मनाला भिडणाऱ्या आहेत.नात्याचे मोल जाणून घेण्याच्या संस्कार, कल्पकता व मार्गदर्शन करणारे शिक्षक, लेखन, वाचन, इंग्रजी वाचन क्षमता वाढविण्यासाठी मनोरंजक खेळ घेतले जातात.कोल्हापूर जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरणारी ही शाळा असून, ना लिपिक, ना शिपाई, पण मुख्याध्यापक व शिक्षकांनी मन लावून, वेळ देऊन हा सर्व नीटनेटकेपणा व व्यवस्थितपणाचे दर्शन घडविले आहे.शाळेचे रेकॉर्ड अगदी व्यवस्थित असून, १०८ फाईल्स व्यवस्थित ठेवलेल्या आहेत.