शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रांवर मोबाइला बंदी, लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात ११ जणांवर गुन्हे

By उद्धव गोडसे | Updated: November 11, 2024 16:41 IST

निवडणूक कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाई

उद्धव गोडसेकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदान करताना काही जणांनी मोबाइलवर ईव्हीएमचे चित्रीकरण केले होते. ते व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग झाला होता. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदारांना मोबाइलसह प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.मतदान प्रक्रिया गोपनीय ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. त्यासाठी मतदान केंद्रांवर मोबाइलसह प्रवेश दिला जात नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मतदार थेट ईव्हीएमपर्यंत मोबाइल घेऊन गेले. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करून ते व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या स्टेटसला ठेवले. सोशल मीडियात व्हायरल केले. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी ११ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना चौकशीसाठी बोलावले.मतदान प्रक्रियेत गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. विधानसभा निवडणुकीत असे प्रकार टाळण्यासाठी मतदारांना मतदान केंद्राबाहेरच मोबाइल ठेवावा लागणार आहे. याची खबरदारी केंद्रावरील निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि पोलिसांना घ्यावी लागणार आहे..

कर्मचाऱ्यांवर जबाबदारीमतदान केंद्रात मोबाइलसह मतदार येणार नाहीत, यासाठी निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. मतदारांना सूचना देणे, त्यांना बाहेरच मोबाइल ठेवण्यास सांगणे, तपासणी करण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागणार आहे. अन्यथा कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले जाणार आहे.

नेते, कार्यकर्त्यांचा अगाऊपणासर्वसामान्य मतदार सूचनांचे पालन करतात. नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र नियम डावलून कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी करतात. लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी मतदानाचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले होते. आपण नेत्याशी, उमेदवाराशी किती प्रामाणिक आहे, हे दाखवण्याच्या प्रयत्नात असे प्रकार घडतात.

दंडात्मक कारवाईमतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग केल्याचे सिद्ध झाल्यास दोषींना आर्थिक दंड होऊ शकतो. तसेच पोलिसांकडून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते. कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी गोपनीयतेचे पालन करा, असे आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानMobileमोबाइलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024