कोल्हापूर : १९८० ते १९९५ सालापर्यंत विविध संघांतून टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या कोल्हापुरातील टेनिसबॉल क्रिकेटपटूंच्या क्रिकेट स्पर्धा व स्नेहमेळाव्याचे आयोजन ज्येष्ठ क्रिकेटपटू मित्रमंडळाच्यावतीने रविवारी केले होते. यात आठ संघांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गांधी मैदान येथे सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या प्रदर्शनीय सामने व स्नेहमेळाव्याचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी संजय पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती आदिल फरास, नगरसेवक रविकिरण इंगवले, संजय मोहिते, उद्योजक प्रकाश राठोड, केदार गयावळ, काका पाटील, गिरीश सामंत व मुख्य पंच विजय सरनाईक, सय्यद पठाण, आदी उपस्थित होते; तर १९८० ते १९९५ सालातील पॉप्युलर स्पोर्टस्, विजय स्पोर्टिंग, दिलीप स्पोर्टिंग, गुडमार्निंग, सुवर्ण गावस्कर, पॉपीलॉन स्पोर्टस् या प्रसिद्ध संघांतील त्या-त्यावेळी खेळलेल्या खेळाडूंनी पुन्हा आपल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघांत दिवसभर सामने झाले. यावेळी बोलताना संयोजक महंमद मुल्ला यांनी, जुन्या खेळाडूं्ना एकत्रित आणून त्यांच्यातील स्नेह आणखी वाढावा याकरिता प्रदर्शनीय सामने व स्नेहमेळावा आयोजित केला असल्याचे सांगितले. ज्येष्ठांच्या प्रदर्शनीय क्रिकेट सामन्यात सहभागी झालेले १९८० ते १९९५ सालातील खेळाडू.
ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा स्नेहमेळावा
By admin | Updated: March 9, 2015 23:51 IST