शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कबनूर चौकात वाहनांना कासवगती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:23 IST

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. ...

अतुल आंबी।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी :इचलकरंजी म्हणजे वस्त्रोद्योगातील अग्रेसर शहर. वस्त्रोद्योगाशी निगडित सूत व कापडाची वाहतूक येथे मोठ्या प्रमाणात होते. आसपासच्या ग्रामीण परिसरातील वीस हजारांहून अधिक कामगारांची ये-जा येथे असते. तसेच दररोज दहा हजारांहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्ञानार्जन करण्यासाठी येथे येतात. साहजिकच इचलकरंजीत येणाºया व जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे. वाहतुकीच्या ‘पिकअवर्स’मध्ये शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या चारही प्रवेशद्वारांवर वाहतूक कोंडी होते. त्याचा व त्यावरील उपायांचा आढावा क्रमश: आजपासून.जिल्ह्यातून शहरात येणारा मुख्य मार्ग म्हणजे इचलकरंजी-कोल्हापूर रोड. मात्र, या मुख्य मार्गावरील कबनूर चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनधारकांना येथून जाताना कासवगतीने वाहने चालवावी लागतात. इचलकरंजी बसस्थानक ते कबनूर ओढा हे अवघे तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी लागणाºया वेळेत संबंधित वाहनचालक कबनूर ओढ्यापासून शिरोलीपर्यंत पोहोचू शकतो. दररोज होणारी कोंडी गुरुवारी तर अधिकच जाम होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक बनले आहे.इचलकरंजीतून दररोज कोल्हापूरला जाणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाºया या मार्गावर दररोज गर्दी असते. बसस्थानक ते एएससी महाविद्यालयापर्यंतचा रस्ता साधारण टप्पा, त्यानंतर एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका हा दुसरा टप्पा आणि आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप हा मुख्य टप्पा. या तीन टप्प्यांत वाहनाची गती मंदावत जाते. तेथून पुढे कबनूर ओढ्यापासून बाहेर पडल्यानंतरच वाहनाला गती मिळते.कोंडी होण्याचे मुख्य कारण बसस्थानक ते एएससी महाविद्यालय या पहिल्या टप्प्यातील वाहतूक मंदावण्याचे मुख्य कारण. अस्ताव्यस्त पार्किंग, रस्त्याकडेला उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, किरकोळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्याकडे येणाºया वाहनधारकांचे होणारे पार्किंग यामुळे वाहनधारकांची गती मंदावते.त्यानंतर दुसºया टप्प्यातील एएससी महाविद्यालय ते कोल्हापूर नाका या मार्गावर रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्याचबरोबर समोरासमोर बसथांबे, अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानदारांचे फलक, मंगल कार्यालय, बार, हॉटेल, तसेच अन्य दुकानदार यांच्याकडे येणाºया ग्राहकांचे रस्त्यावर होणारे पार्किंग या कारणांमुळे रस्ता अतिशय अरुंद बनला आहे. त्यामुळे या दुसºया टप्प्यातून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. मोटारसायकलस्वारही एखाद्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती नेहमी या टप्प्यामध्ये असते. बस, ट्रक अशी मोठी वाहने पुढे असल्यास रुग्णवाहिकेलाही ओव्हरटेक करून पुढे जाण्यासाठी वाव मिळत नाही, अशी गंभीर परिस्थिती या टप्प्यात आढळते. त्यातच एखादे मोठे वाहन आल्यास बºयाच वेळा वाहतूक ठप्प होते. आजरा बॅँक ते कबनूर पेट्रोल पंप या टप्प्यात वाहतुकीची वारंवार कोंडी होते. गुरुवारी ग्रामदैवत असलेल्या दर्ग्याला भाविकांची गर्दी होते. त्यादिवशी भाविकांची गर्दी, तसेच त्यांच्याबरोबर असलेली वाहने रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतूक बºयाच वेळा आणि वारंवार ठप्प होते. कबनूर चौकामधून चंदूर, रुई, इंगळी, कोल्हापूर, कोरोची, इचलकरंजी याठिकाणची वाहतूक नियमित होत असते. त्यामुळे या चौकात वारंवार कोंडी निर्माण होते.कबनूर चौक पार करून कोल्हापूरकडे जाणाºया वाहनधारकाला या वाहतुकीच्या कोंडीतून थांबत-थांबतच मार्ग काढावा लागतो. वाहनधारकांबरोबरच रुग्णवाहिकेलाही या कोंडीचा सामना करावा लागतो. (क्रमश:)उपाययोजना१ मुख्य मार्गावरील ब्लॉकचा मुख्य टप्पा ओलांडण्यासाठी होणारा त्रास संपविण्यासाठी कबनूर येथे उड्डाण पूल केल्यास यातून इचलकरंजीकडील वाहतुकीचा मोठा ताण कबनूरमधून कमी होईल. तसेच इचलकरंजीवासीयांनाही कोल्हापूरकडे जाताना हा ब्लॉक सहन करावा लागणार नाही.२ दुसºया टप्प्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या मार्गावरील लग्न कार्यालये, हॉटेल, विविध प्रकारची दुकाने यांना त्यांच्याकडे येणाºया ग्राहकांच्या पार्किंगसाठी नियोजन करायला लावणे. इतर ठिकाणी होणाºया अस्ताव्यस्त पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करावे. त्याचबरोबर मार्गावरील अतिक्रमणे हटवावीत.३ तिसºया टप्प्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभारणारे खाद्यपदार्थांचे गाडे, त्याच्याभोवती ग्राहकांचे अस्ताव्यस्त होणारे पार्किंग, किरकोळ विक्रेत्यांचे रस्त्यावर अतिक्रमण करून लावलेले विक्रीचे स्टॉल हटविणे. तसेच नियमित पार्किंगसाठी सम-विषम पार्किंगचे नियोजन करणे. अशा उपाययोजना राबविल्यास या मार्गावरील होणारी कोंडी नक्कीच सुरळीत होईल.