शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात वाहनविक्री जोमात, नऊ महिन्यांत ९० हजार नवीन वाहने रस्त्यावर

By सचिन यादव | Updated: October 10, 2025 18:25 IST

महिन्याला हजार कार, चार हजार नव्या दुचाकी येतात रस्त्यावर

सचिन यादवकोल्हापूर : जिल्ह्यात रोज सरासरी ३३३ नव्या वाहनांची (दरमहा १० हजार) विक्री होत आहे. यामध्ये रोज सरासरी एक हजार कार आणि चार हजार दुचाकींसह इतर वाहने रस्त्यावर असल्याची माहिती कोल्हापूर आणि इचलकरंजी आरटीओकडील नोंदीवरून समोर आली आहे. १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या नऊ महिन्यांत ९० हजार वाहने रस्त्यावर आली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी, मालवाहतुकीच्या वाहनांसह कृषी ट्रॅक्टर्सची संख्या मोठी आहे.कोल्हापूर, इचलकरंजीसह राष्ट्रीय महामार्ग परिसरात चारचाकी, ट्रॅक्टर्सचे सर्वाधिक शोरूम आहेत. त्यासह शहरात दुचाकीचे शोरूम आहेत. याशिवाय बहुतेक तालुक्यांमध्ये देखील कंपन्यांची शोरूम आहेत. कोणत्याही कंपनीची कोणत्याही मॉडेलची दुचाकी, चारचाकी घेण्यासाठी मुंबई आणि पुणे येथे जावे लागत नाही. इतकी शोरूम कोल्हापुरात आहेत.तीस वर्षांपूर्वी एखाद्या गावात एकमेव चारचाकी, बोटावर मोजण्याइतक्याच दुचाकी दिसायच्या. काही वर्षांपूर्वी दुचाकीसाठी नंबर लावावा लागत होता. त्याची डिलिव्हरी तीन महिन्यांनंतर ग्राहकांना मिळत होती. आता घरातील प्रत्येक सदस्यांकडे दुचाकी, सरासरी प्रत्येक घरात चारचाकी आहे. काहींकडे पेट्रोलसह इलेक्ट्रिक बाइकही आहे. केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि त्यासाठी अनेक बँका, फायनान्सचे कर्ज ग्राहकांना सहजासहजी उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

‘आरटीओ’कडील वाहन खरेदीची नोंदमहिना/ कार/ चारचाकी/ दुचाकी/ ट्रॅक्टर/ मालवाहतूक

  • जानेवारी / १३०८/ ४२९३ / १३१ / २२४
  • फेब्रुवारी / ६०३ / ३०७९ / १४० / १३५
  • मार्च / ११७५ / ४४८५ / ११० / २२८
  • एप्रिल / ८१७ / ५८३१ / १०५ / १४७
  • मे / ७०२ / ४६५२ / ९३ / १३४
  • जून / ७२० / २९७१ / ८७ / १४१
  • जुलै /८२३ / ३३०४ / १०७ / १२५
  • ऑगस्ट/ ९५४ / ३४४४ / ६२ / १५५
  • सप्टेंबर /८९५ / ३११९ / ८२ / १३२ 

इचलकरंजी ४३ हजार वाहनांची विक्रीइचलकरंजी (एमएच ५१) मध्ये गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत सरासरी ४३ हजार वाहनांची विक्री झाली आहे. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी वाहने अधिक विक्री झाली आहेत.

जिल्ह्यात होणारी वाहनांची विक्री अशी..चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या काळात दरमहा सरासरी चार हजार दुचाकी आणि एक हजार चारचाकी खरेदी ग्राहकांनी केल्याचे दोन्ही आरटीओ कार्यालयाकडील नोंदीवरून समोर आले आहे. शहर-जिल्ह्यात नवे वर्ष गुढीपाडवा, दिवाळी-दसरा, धनत्रयोदशी अशां शुभमुहूर्तावर वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे.

कोल्हापूर आरटीओकडील दरमहा नोंदणीची आकडेवारी

  • जानेवारी / ६२०२
  • फेब्रुवारी / ४१२३
  • मार्च/६११८
  • एप्रिल/७१२२
  • मे /५७२१
  • जून/ ४०७२
  • जुलै/४४८५
  • ऑगस्ट/ ४७७२
  • सप्टेंबर /४३९९

वाहन नोंदणीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सणासुदीच्या काळातही मोठ्या संख्येने वाहनांची नोंद केली जाते. त्यासाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Vehicle Sales Surge: 90,000 New Vehicles in Nine Months

Web Summary : Kolhapur sees a vehicle sales boom, with 90,000 new vehicles hitting roads in nine months. Increased showroom availability and easy financing options are driving the surge in two and four-wheeler purchases.