शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली : कडधान्य, साखर तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 14:00 IST

महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.

ठळक मुद्देभाजीपाल्याच्या दरात वाढ, मेथी, पालकही कडाडली कडधान्य, साखर तेजीत

कोल्हापूर : महापूर, श्रावणाचा शेवट व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गवार, श्रावण घेवडा, कारली, भेंडी ८० रुपये किलोपर्यंत पोहोचली असून, गेल्या आठवड्यापेक्षा त्यात दीडपट वाढ झाली आहे. कडधान्यांच्या दरातील तेजी कायम असून, साखरेनेही उचल खाण्यास सुरुवात केली आहे. तुलनेत फळमार्केट शांत असून, दर स्थिर आहेत.महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात भाजीपाला उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा परिणाम कोल्हापुरातील आवकेवर झाल्याने दरात वाढ झाली; पण कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक झाल्याने दर थोडेफार आवाक्यात आले असताना या आठवड्यात भाजीपाल्याने आणखी उसळी घेतली आहे.

श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; त्यामुळे दरात वाढ झाली आहे. घेवड्याची आवक श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात होते. पावसामुळे ती कमी झाल्याने घेवड्याचे दर वाढले असून, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो आहे.

गवार, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचेही दर ६० पासून १०० रुपयांपर्यंत आहेत. वांगी ७५ रुपये, तर ओला वाटाणा १२० रुपये किलो आहे. एरव्ही १0-१५ रुपये असणारा टोमॅटो रविवारी ३0 रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. कोथिंबिरीची पेंढी २० रुपये, मेथी २५ रुपये, तर पालक २० रुपये पेंढी आहे.महापुरानंतर कडधान्यांची आवक मंदावली असून, किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. ज्वारी ३५ ते ५० रुपये किलोपर्यंत आहे. तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात थोडी थोडी वाढ होत आहे. साखरेचे दरही वाढले असून, किरकोळ बाजारात ते ३६ रुपये किलो आहे. सरकी तेल, शाबूसह इतर किराणा वस्तूंचे दर स्थिर आहेत.फळ मार्केटमध्ये विविध फळांची रेलचेल सुरू असली, तरी दर स्थिर राहिले आहेत. गणेशोत्सवासाठी फळमार्केट सज्ज झाले असून, सफरचंद, डाळिंब, मोसंबी, सीताफळाची आवक बऱ्यापैकी आहे. कांद्याची आवक मंदावल्याने दर तेजीत आहेत. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा २७ रुपये किलो आहे. बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत.गूळ ५० रुपये किलो!गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात वाढ झाली आहे. गुळाचा हंगाम संपल्यापासून ४० रुपये किलो दर होता; मात्र किलोमागे १0 रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात ५० रुपये किलो आहे.

‘ड्रायगन’, ‘किव्ही’ची मागणी वाढलीजिल्ह्यात महापुरानंतर पावसाने एकदम उघडीप दिल्याने साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. रक्तातील प्लेटलेटची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असून, त्यासाठी ‘ड्रायगन’, ‘किव्ही’ फळांची मागणी वाढली आहे.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर