कोल्हापूर : श्री वीरशैव को-ऑप. बँकेच्या (मल्टीस्टेट) निवडणुकीसाठी गुरुवारी दुसऱ्या दिवशी १४ अर्ज दाखल झाले. त्यामुळे दोन दिवसातील अर्जाची संख्या ३५वर पोहोचली आहे.
बहुराज्यीय कार्यक्षेत्र असलेल्या या बॅंकेच्या १९ जागांसाठी २५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडून देण्यात येणाऱ्या पदांपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र आली तर ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. दिनांक ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दोन दिवसात सर्वसाधारण गटाचे एकूण २० उमेदवारांचे ३०, महिला गटात दोन उमेदवारांचे तीन, तर अनुसुचित जाती गटातील एका उमेदवाराचे दोन अर्ज आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे हे काम पाहात आहेत.