वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:37 AM2020-12-16T04:37:40+5:302020-12-16T04:37:40+5:30

महापालिकेतर्फे पुढील वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. कंसामध्ये शहिद जवानांची नावे आहेत : श्रीमती ऊर्मिला मरळे (निवृत्ती ...

Veermata, Veerpita, Veerpatni felicitated by the Municipal Corporation | वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेतर्फे सत्कार

वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेतर्फे सत्कार

Next

महापालिकेतर्फे पुढील वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. कंसामध्ये शहिद जवानांची नावे आहेत : श्रीमती ऊर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुलोचना रावराणे (लक्ष्मण रावराणे), श्रीमती कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), सौ. माणिक वालकर (कॅप्टन शंकर वालकर), श्रीमती सुनीता देसाई (मेजर मच्छिंद्र देसाई), श्रीमती आनंदी उलपे (दिगंबर उलपे), श्रीमती मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (मेजर सत्यजित शिंदे), अनिल चिले (सुनील चिले), श्रीमती जाई जाधव (भगवान जाधव), श्रीमती अंजनी पाटील (श्रीकांत पाटील).

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, साहाय्यक संचालक (नगररचना) रामचंद्र महाजन, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, प्रभारी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, अग्निशमन दलाचे जवान, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी, व्यायामशाळा प्रशिक्षक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १५१२२०२०-कोल-केएमसी सत्कार

ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी वर्धापनदिनानिमित्त शहरातील वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Veermata, Veerpita, Veerpatni felicitated by the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.