तिरुअनंतपुरम : केरळ येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरचा सुपुत्र आणि वीरधवल खाडे याने जलरतरणात सुवर्णपदक आणि मुरगूडची वीरकन्या नंदिनी साळोखे हिने कुस्तीमध्ये रौप्यपदक मिळवून करवीर नगरीचा झेंडा फडकवला. वीरधवलने मंगळवारी जलतरणात राष्ट्रीय विक्रमही नोंदविला. पुरुषांच्या ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात आॅलिम्पिकपटू वीरधवल खाडेने २३.०० सेकंदाची वेळ नोंद करून नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याची ही कामगिरी त्याला सुवर्णपदकापर्यंत घेऊन गेली. या स्पर्धेत ४८ वजन किलो गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुरगूड (ता. कागल) येथील नंदिनी बाजीराव साळोखे हिने रौप्यपदक पटकाविले. महिला संघातील तीन दिवसांच्या सत्रात महाराष्ट्राला नंदिनीच्या रूपाने एकमेव पहिले रौप्यपदक मिळाले. ही बातमी समजल्यानंतर मुरगूडमध्ये नागरिकांनी जल्लोष केला. या यशामुळे नंदिनीची आंतरराष्ट्रीय कुस्ती शिबिरासाठी निवड झाली आहे. / आणखी वृत्त क्रीडादोन वर्षांनंतर त्याने पुन्हा पदार्पण करीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राचे व कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. या स्पर्धेत त्याची अजून चार प्रकारांतील स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये तो अशीच यशस्वी कामगिरी नक्कीच करेल. या यशस्वी कामगिरीमुळे कोल्हापूरच्या क्रीडानगरीने पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे. - विक्रम खाडे, वीरधवलचे वडील
वीरधवलला सुवर्ण, नंदिनीला रौप्य
By admin | Updated: February 4, 2015 00:57 IST