शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

Kolhapur: वीर शिवा काशीद समाधीस्थळ, परिसर नुतनीकरणाचा आराखडा तयार करा - खासदार धैर्यशील माने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 16:15 IST

पन्हाळा : वीर शिवा काशीद समाधी स्थळ व परिसराच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करा, तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत ...

पन्हाळा : वीर शिवा काशीद समाधी स्थळ व परिसराच्या नुतनीकरणाचा आराखडा तयार करा, तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लागणारा निधी देतो असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. लवकरच पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेले वीर शिवा काशीद समाधीस्थळ महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे स्मारक बनवू असेही खा. माने यांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कोल्हापूर व नाभिक समाज बांधवांच्यावतीने वीर शिवा काशीद यांची ३६४ वी पुण्यतिथी पन्हाळा येथे विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. सुरवातीला शिवा काशीद समाधीस खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या हस्ते पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, समरजितसिह घाटगे, माजी आमदार चंद्रदीप नरके, निर्मल ग्रामप्रणेते भारत पाटील उपस्थित होते. त्यानंतर पन्हाळा नगरपरिषदेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व पुरस्कार प्राप्त समाज बंधू भगिनीचा सत्कार करण्यात आला. प्रा.मधुकर पाटील यांचे समाज प्रबोधनपर व्याख्यान झाले. यावेळी नाभिक महामंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठया संखेने आलेल्या नाभिका समाजाच्या बंधू भगिनींनी व शिवभक्तांनी शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.या कार्यक्रमाला पन्हाळा नगर माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी पोलीस पाटील भीमराव काशिद, नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष सयाजी झुंझार, बाबासाहेब काशीद, मारुती टिपुगडे, मेघारणी जाधव, मोहन चव्हाण, संतोष चव्हाण, संजय रोकडे, दिपक खराडे, वीर शिवा काशीद स्मारक समितीचे व संवर्धन समितीचे पदाधिकारी तसेच शिवभक्त व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdhairyasheel maneधैर्यशील माने