शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी नावाने विडीविक्री, संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने १९ लाखांचा माल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 13:41 IST

संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संभाजी विडी या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पुण्यातील कंपनीने सुमारे १९ लाखांचा माल परत पाठवण्यात यश आले.

ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विडीविक्रीसंभाजी ब्रिगेडच्या दणक्याने १९ लाखांचा माल परत

शिरोली :  संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संभाजी विडी या नावाने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या पुण्यातील कंपनीने सुमारे १९ लाखांचा माल परत पाठवण्यात यश आले.

संभाजी विडी या नावाने पुण्याहून कोल्हापूरला विक्रीला हा माल आला होता. हे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुमारे १९ लाखांचा माल व्यावसायिकांच्याकडून ताब्यात घेऊन ट्रान्सपोर्टने पुुन्हा पुण्याला कंपनीला पाठवला. संभाजी नावाने विडी विक्री करायची नाही, असा इशाराही संबंधित कंपनी आणि व्यावसायिकांना संघटनेने दिला आहे.संभाजी विडी विक्री करणारी गाडी पुणे येथून गुरुवारी (दि.२० रोजी) कोल्हापूरात आली होती. ही गाडी कागल, गोकुळशिरगांव, गांधीनगर ,कोल्हापूर शहर,पेठ वडगांव, इचलकरंजी, गडडिग्लज आदी ठिकाणी व्यावसायिकांना माल टाकत शहरात स्टेशन रोडवर आली. 

गाडीवर संभाजी असे नाव पाहुन संभाजी ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याची चौकशी केली असता पुणे येथून संभाजी विडी घेऊन माल विक्रीसाठी आणला आहे असे संबंधित गाडी चालकाने सांगितले. यावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी व्यवस्थापनाशी बोलणं करत गाडी सोडणार नाही, असा इशारा दिला.छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विडी विकता, हे खपवून घेणार नाही. ज्या छत्रपती संभाजीराजांना कशाचही व्यसन नव्हते, त्या राजाच्या नावाने तुम्ही विडी विकता हे कोल्हापूरात चालणार नाही, गाडीतील माल परत घेऊन जा असा इशारा दिला.

यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी व्यावसायिकांना विडी विक्रीसाठी पाठवल्या होत्या, तो सुमारे पाच लाखांचा सगळा माल गोळा करून संभाजी ब्रिगेडने आलेल्या गाडीतून परत पुण्याला पाठवला. संभाजी नावाने विडी विक्री करू नये अशी विनंती संभाजी ब्रिगेडने शहरातील व्यावसायिकांना केली.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, विकी जाधव, निलेश सुतार, अभिजीत कांजर, अभिजीत भोसले, मदन परीट, उमेश जाधव,शहाबाज शेख, प्रवीण काटे आदी कार्यकर्ते सहभागी होते.

कोल्हापुरातील आंदोलनाला सकारात्मक प्रतिसादसंभाजी बिडी विरोधातील संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला सोमवारी कोल्हापुरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद देत आपल्याकडील शिल्लक सर्व मालसुद्धा कंपनीला परत पाठवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे १० लाखांचा माल सोमवारी ट्रान्सपोर्टने पुण्याला परत पाठवला. जिल्हा पानपट्टी असोसिएशन यांनी सुद्धा इथून पुढे संभाजी विडीची खरेदी-विक्री करणार नसल्याचे जाहीर केले आहे. इथून पुढे भविष्यात महापुरुषाच्या नावाने असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि खरेदी करणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

व्यापाऱ्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला चांगलाच चोप

दरम्यान, साहेब मी संघटनेची  पावती फाडतो, मी ब्लॅकने माल विकतो असे म्हणणाऱ्या शहरातील व्यापाऱ्याला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. 

छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय महापुरुष आहेत त्यांनी आपल्या संपूर्ण जीवन काळामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन केले नाही आणि त्याच महापुरुषाच्या नावाने कोणी तंबाखूजन्य पदार्थ विकत असेल तर ही गोष्ट अत्यंत खेदजनक आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने महापुरूषांच्या नावाने येणारा माल खरेदी करू नये. आणि कोणत्याही कंपनीने महापुरूषांच्या नावाने तंबाखूजन्य माल विक्री केल्यास त्याला सडेतोड उत्तर देऊ - रुपेश पाटील,जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडkolhapurकोल्हापूर