शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड तर सुनील पाटील नवी मुंबईला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:12 IST

police, transfar, kolhapurnews राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालकांनी गुरुवारी रात्री काढले. कोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड येथे तर करवीर पोलीस ठाण्यातील सुनील पाटील यांची नवी मुंबई येथे बदली झाली शिवाय कोल्हापूर वायरलेस शाखेतील रियाज अहमद लालेमहमद शेख यांची सांगली येथे बदली झाली आहे.

ठळक मुद्देवसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड तर सुनील पाटील नवी मुंबईला बदलीपोलीस निरीक्षकांच्या बदल्या : इतर जिल्ह्यांतून पाच निरीक्षकांची कोल्हापुरात बदली

कोल्हापूर : राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालकांनी गुरुवारी रात्री काढले. कोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांची पिंपरी-चिंचवड येथे तर करवीर पोलीस ठाण्यातील सुनील पाटील यांची नवी मुंबई येथे बदली झाली शिवाय कोल्हापूर वायरलेस शाखेतील रियाज अहमद लालेमहमद शेख यांची सांगली येथे बदली झाली आहे.याशिवाय इतर जिल्ह्यांतील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापुरात झाल्या आहेत. यामध्ये राज्य गुप्त वार्ता (सीआयडी)चे संतोष श्रीमंत पाटील, ठाणे शहरातील रमेश तुकाराम काटकर, पोलीस प्रशिक्षण विभाग मरोळचे भैरू अंतू तळेकर, मुंबई शहर येथून संतोष जाधव, बीड येथून रमेश रामकृष्ण मोरे यांचा कोल्हापुरात बदली झालेल्यामध्ये समावेश आहे.

गुरुवारी रात्री उशिरा हे बदलींचे आदेश निघाले. बदली झालेल्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, पर्यायी बदलीवर येणाऱ्या पोलीस निरीक्षकांची वाट पाहू नये, असेही आदेशात पोलीस महासंचालकांनी म्हटले आहे.

टॅग्स :TransferबदलीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर