शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

वरुणराजाच्या साक्षीने रंगला कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 22:35 IST

तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि गुरूमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला

कोल्हापूर - तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती, आणि गुरूमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमी पूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला. सोनं घ्या सोन्यासारखं रहा असे सांगत कोल्हापूरकरांनी दस-याचा आनंद लुटला. असूरांचा संहार करणारी साडेतीन शक्तीपीठातील देवता करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता विजयादशमीला सीमोल्लंघनाने झाली. ईश्वरी सत्ता आणि कोल्हापूर संस्थान सत्तेचा अनोखा मेळ साधणारा शाही सीमोल्लंघन सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात रंगला.

आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार...घोडेस्वार ...अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीच्या उत्सवमूर्ती, कोल्हापूर संस्थानचे शाहू छत्रपती खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते शमी पूजन झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, महापौर हसिना फरास, माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडीक विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, संजय डी. पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलीस उपअधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगूरू डॉ. देवानंद शिंदे, तसेच सरदार घराण्याचे मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. 

म्हैसूर ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची आणि तुळजाभवानी देवी व गुरुमहाराजांच्या पालख्या आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान,शाहू महाराजांचेदेखील मेबॅक गाडीतून सोहळास्थळी आगमन झाले. येथे पोलिस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती सुरू झाली आणि जोरदार सरींनी पावसाला सुरुवात झाली. या पावसात शाहू छत्रपतींनी देवीची आरती व शमी पूजन केले. मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला. अंबाबाईची पालखी आपल्या लव्या-जम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. 

अंबाबाईची रथातील पूजा आठ दिवस महिषासूराशी घनघोर युद्ध करून विजय मिळविलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा या मागचा अन्वयार्थ आहे. 

मेबॅकमध्ये नवी पिढी स्वारदरवर्षी साजरा होणा-या दसरा सोहळ्यासाठी शाहू छत्रपती, संभाजीराजे, मालोजीराजे मेबॅक कारमधून दसरा चौकात येतात. यंदा मात्र शाहू महाराजांसोबत शहाजीराजे, यशराजराजे व यशस्विनीराजे या कारमधून सोहळ्याला आल्या. त्यांच्या मागील वाहनातून संभाजीराजे व मालोजीराजे आले.