शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

मंगळवार पेठेत घडणार वैविध्यपूर्ण मूर्तींचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 01:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गणेशमूर्तींतील विविधता पाहायची असेल तर मंगळवार पेठेत फेरफटका मारणे उचित ठरेल. सजीव देखावे तसेच विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्तींचे वेगळेपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मंगळवार पेठेने जपले आहे. तर गणेश चतुर्थीच्या दुसºया दिवशीही अनेक लहान-मोठ्या मंडळांनी ‘श्री’च्या मूर्तीची वाजत-गाजत प्रतिष्ठापना केली.गणेशोत्सवात गणेशमूर्तींची विविधता ही मंगळवार पेठेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ...

ठळक मुद्देदुसºया दिवशीही अनेक लहान-मोठ्या मंडळांनी ‘श्री’च्या मूर्तीची वाजत-गाजत प्रतिष्ठापना केली.पुरातन काळातील आकर्षक गणेशमूर्ती निर्माण करून वेगळेपण निर्माण केले आहे. मिरजकर तिकटी ते शिवाजी स्टेडियमकडे जाणारा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गणेशमूर्तींतील विविधता पाहायची असेल तर मंगळवार पेठेत फेरफटका मारणे उचित ठरेल. सजीव देखावे तसेच विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्तींचे वेगळेपण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मंगळवार पेठेने जपले आहे. तर गणेश चतुर्थीच्या दुसºया दिवशीही अनेक लहान-मोठ्या मंडळांनी ‘श्री’च्या मूर्तीची वाजत-गाजत प्रतिष्ठापना केली.

गणेशोत्सवात गणेशमूर्तींची विविधता ही मंगळवार पेठेत प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पाहावयास मिळत आहे. अशा वैविध्यपूर्ण गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना शुक्रवारी झाली असली, तरीही त्या गणेशमूर्तींभोवती सजावट, विद्युत रोषणाई, देखावे करण्यात गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्ते झटत आहेत.पुरातन काळातील गणेशमूर्ती निर्माण करण्याची आवड जय पद्मावती तरुण मंडळाने परिसरातील मंडळांच्यात निर्माण केली. या मंडळाने गेल्या २५ वर्षांत देश-विदेशांतील, पुरातन काळातील आकर्षक गणेशमूर्ती निर्माण करून वेगळेपण निर्माण केले आहे.

यंदाच्या वर्षी मंडळातर्फे थायलंड देशातील एका पार्कमधील आकर्षक त्रिभूज प्राचीन गणेशमूर्ती साकारली आहे. याशिवाय याच परिसरात राधाकृष्ण तरुण मंडळाने श्रीकृष्ण रूपातील गणेशमूर्ती, याशिवाय फिरत्या भोवºयावर नृत्य करणारा भव्य श्री गणेश, कोळेकर तिकटी चौकातील मॉडर्न स्पोर्टस क्लबने माकडखेळ करणारा श्री गणेश अशा अनेक आकर्षक गणेशमूर्ती हेच मंगळवार पेठेचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. ‘प्रिन्स क्लब’चे उखाणे ऐकण्यास गर्दी

गणेशोत्सवात प्रतिवर्षी लक्ष वेधणाºया खासबाग येथील प्रिन्स क्लबने यंदा मंडळाच्या उत्सवाची धुरा सर्व महिला व युवतींकडे सोपवली आहे. मंडळाच्या गणेश आगमन मिरवणुकीत परिसरातील महिला व युवतींनी डोक्यावर भगवे फेटे परिधान करून हलगीच्या तालावर लेझीम खेळून साºयांचे लक्ष वेधले, तर शनिवारी या मंडळाच्यावतीने सायंकाळी महिलांसाठी उखाणा स्पर्धा घेतल्या. उखाणे ऐकण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे मिरजकर तिकटी ते शिवाजी स्टेडियमकडे जाणारा मार्ग वाहतुकीला बंद करण्यात आला होता.पाटाकडीलचा  गणेशोत्सव शांततेतप्रतिवर्षी गणेशोत्सवात मंगळवार पेठेत लक्ष वेधणाºया पाटाकडील तालीम मंडळाने यंदाचा गणेशोत्सव शांततेत करण्याचा निर्णय घेतला आहे. फुटबॉल संघाचे अध्यक्ष पांडबा जाधव यांचे निधन झाल्याने गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोळेकर तिकटी चौकातील ब्लड गु्रपचाही गणेशोत्सव शांततेत करण्यात येत आहे.