शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा समृध्द करण्यासाठी विविध प्रयोग व्हावेत : वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 15:19 IST

Marathi Bhasha Din Shivaji University Kolhapur- विविध क्षेत्रातील लोकांचे लेखन, इतर भाषा आणि त्यातील साहित्य स्वीकारून त्याचा अनुवाद करणे, असे विविध प्रयोग मराठी भाषा समृध्द करण्यासाठी व्हावेत. मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी आदी सर्व विद्याशाखांचे ज्ञान, माहिती मराठी भाषेमध्ये यावी, असे प्रतिपादन ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले यांनी केले.

ठळक मुद्देव्ही. एन. शिंदे, अनुप जत्राटकर यांचा सत्कार शिवाजी विद्यापीठात मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन

कोल्हापूर : विविध क्षेत्रातील लोकांचे लेखन, इतर भाषा आणि त्यातील साहित्य स्वीकारून त्याचा अनुवाद करणे, असे विविध प्रयोग मराठी भाषा समृध्द करण्यासाठी व्हावेत. मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी आदी सर्व विद्याशाखांचे ज्ञान, माहिती मराठी भाषेमध्ये यावी, असे प्रतिपादन ह्यलोकमतह्णचे संपादक वसंत भोसले यांनी केले.शिवाजी विद्यापीठातील मराठी अ‌धिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार विजेत्या लेखकांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

शासनाचा महात्मा फुले वाङ्मय पुरस्कार विजेते डॉ. व्ही. एन. शिंदे आणि विजय तेंडुलकर वाङ्मय पुरस्कार विजेते अनुप जत्राटकर यांचा सत्कार संपादक वसंत भोसले यांच्याहस्ते शाल, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.युरोपियन देश, स्वीडनच्या लोकसंख्येपेक्षा आपल्या राज्यातील मराठी भाषिक अधिक आहेत. या देशांनी मातृभाषा समृध्द केली. मात्र, आपण त्यादृष्टीने मराठीबाबत फार काही केले नसल्याची खंत आहे.

मराठी भाषा समृध्द होण्यासाठी इतर भाषांमधील साहित्य मराठीत यावे. विविध क्षेत्रातील लोकांनी मराठीत लेखन करावे. त्यादृष्टीने डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी विज्ञान लेखनाचे टाकलेले पाऊल उल्लेखनीय असून त्यांनी यापुढेही लेखन सुरू ठेवावे. अनुप जत्राटकर यांनीही एकांकिका लेखनाच्या माध्यमातून मराठी भाषेला बळ देण्याचे काम केले असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.मराठीत बोलणे, वाचणे, लिहिणे केले, तरच ही भाषा समृध्द होईल. त्यादृष्टीने मराठी विभागाचे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. ह्यलोकमतह्णमधील लेखांमुळे पुस्तक लिहिले. त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या संपादकांच्याहस्ते माझा सत्कार झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञानाचा हात धरून लेखन क्षेत्रात वाटचाल करणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

निष्पर्णमध्ये स्त्रियांची मानसिकता मांडली आहे. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असल्याचे दिग्दर्शक जत्राटकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. केशव राजपुरे, के. डी. सोनवणे, आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राजेश पाटील यांनी आभार मानले.मराठी चित्रपटांबाबत विचार गरजेचान्यूयॉर्क शहरात १९३ भाषा लिहिता-वाचता येणारे, तर ८०० बोलीभाषा बोलणारे लोक राहतात. जगभरातील सांस्कृतिक, साहित्यिक आदान-प्रदानाचे ते केंद्रच बनले आहे. दाक्षिणात्य प्रादेशिक भाषांतील चित्रपट जगाची भाषा बोलत असून, त्यांची स्वीकारार्हता वृद्धिंगत करताना त्यांच्या तुलनेत मराठी चित्रपट कमी पडताहेत का? याचा विचार करण्याची गरज असल्याचे संपादक भोसले यांनी सांगितले.कुस्ती, चित्रपटांचा इतिहास विद्यापीठाने लिहावाकोयना प्रकल्पाच्या निर्मितीवर पुस्तक लिहिण्याचे काम डॉ. शिंदे यांनी करावे. कोल्हापुरी कुस्ती आणि मराठी चित्रपटांच्या इतिहासाचे लेखन विद्यापीठाकडून व्हावे, असे संपादक भोसले यांनी यावेळी सुचविले. याबाबत विद्यापीठ निश्चितपणे विचार करेल, असे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. 

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर