शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वनताराची टीम नांदणीला भेट देणार, हत्तीणीसाठी सर्वपक्षीय नेते धावले मठाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 12:50 IST

पुनर्विचार याचिका दाखल करणार

कोल्हापूर: नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी हत्तीणीचा राधे कृष्ण एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट, जामनगर (गुजरात) येथे हस्तांतरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परिणामी नागरिकांनी जिओ कार्डवर बॉयकॉट करण्यास सुरुवात केली. यामुळे याची गंभीर दखल घेत वनताराचे सीईओ विहान करणी यांच्यासह टीम नांदणी मठातील महाराजांशी चर्चा करण्यासाठी कोल्हापूरला येणार आहे.सर्वपक्षीय नेते धावले नांदणी मठाकडेजयसिंगपूर : समाजमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणात महादेवी हत्तिणीबद्दल धुरळा उडाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी नांदणी (ता. शिरोळ) येथील मठाकडे धाव घेतल्याचे चित्र गुरुवारी दिसले. आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवून राष्ट्रपतींची भेट घेण्याचा मनोदय व्यक्त केला, तर अन्य आजी-माजी आमदारांनी हत्तिणीला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.नांदणी येथे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात दिवसभरात आमदार पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार राजू आवळे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, भाजपचे नेते सावकार मादनाईक, दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री अनिल बागणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन महादेवी हत्तिणीबाबत स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी चर्चा केली.पुनर्विचार याचिका दाखल करणारमहादेवी हत्तिणीला मठाकडे ठेवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका फेटाळल्याने हत्तिणीला रवाना करण्यात आले. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.‘महादेवी’ला पुन्हा मठात आणण्यासाठी सहकार्य, केंद्रीय वनमंत्र्यांची ग्वाहीनांदणी येथील मठातील ‘महादेवी’ हत्तिणीला पुन्हा मठात आणण्यासाठी पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी नवी दिल्लीत त्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. स्थानिक नागरिकांनी गेल्या चार दिवसांत केलेली आंदोलने, त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया याची माहिती महाडिक यांनी मंत्र्यांना दिली.सोशल मीडियावरही ट्रेंड‘एक स्वाक्षरी महादेवीला आपल्या घरी आणण्यासाठी’ ही मोहीम सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रचंड लोकप्रिय झाली आहे. जिल्ह्यात फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटरवर हे क्यूआर कोड व्हायरल केले जात आहेत. विशेष म्हणजे, मोबाइलवर तर स्टेटसचा अक्षरश: पाऊस पडला आहे.