शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

महादेवी हत्तिणीला नांदणी मठाकडे देण्यास वनतारा तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:59 IST

बैठकीस नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, कर्नाटकातील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महास्वामी, वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीण वनतारामध्ये आहे. ती परत नांदणी मठाकडे देण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार असलेल्या फेरविचार याचिकेसंदर्भातील बैठकीत वनतारा सहभागी होणार आहे. ज्या आधारावर न्यायालयाने वनताराकडे हत्तीण देण्याचा आदेश दिला आहे. त्याच सेवा, सुविधा हत्तिणीसाठी नांदणी मठाच्या जमिनीत पुनर्वसन केंद्र उभारून दिल्या जातील. त्या केंद्रासाठी आवश्यक असलेली जमीन देण्याचा निर्णय बुधवारी जैन बोर्डिंगमध्ये झालेल्या बैठकीत झाला.बैठकीस नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन भट्टारक महास्वामी, कर्नाटकातील वरूर मठाचे स्वस्तिश्री धर्मसेन महास्वामी, वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान करणी यांची प्रमुख उपस्थिती होती.महादेवीला परत आण्यासाठीचा रेटा वाढल्यानंतर वनताराचे सीईओ विहान करणी दुसऱ्यांदा कोल्हापूरला आले. बैठकीत त्यांनी सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनताराने महादेवीला ताब्यात घेतल्याचे सांगितले. वनतारा तिची पुरेपूर काळजी घेत आहे. सर्वाेच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेलाही सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. करणी यांनी बैठकीत न्यायालयाने आदेश दिला तर पुन्हा महादेवीला मठाच्या ताब्यात देण्यास तयार आहे. तोपर्यंत बहिष्काराचे सत्र मागे घ्या, अशी विनंती केली. यावर उपस्थित असलेल्या सर्वांनीच बहिष्कार जनतेने टाकल्याचे स्पष्ट केले.प्रचंड पोलिस बंदोबस्त या बैठकीसाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. राजकीय प्रतिनिधीच्या स्वीय सहायकांनाही बाहेर काढण्यात आले. प्रवेशद्वारावर पोलिसांची फौज सज्ज होती. बैठकीस आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, निवेदिता माने, प्रकाश आवाडे, कृष्णराज महाडिक, भगवान काटे, सावकर मादनाईक, जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

वनतारा सीईओ आणि शेट्टी यांच्यात चकमकबैठकीत वनताराचे सीईओ करणी यांनी महादेवी हत्तिणीची काळजी किती चांगली घेत आहोत, हे सांगत होते. यावर शेट्टी यांनी जोरदार आक्षेप घेत मठही चांगल्याप्रकारेच देखभाल आणि तिची काळजी घेत होता. कॉर्पाेरेट कार्यालयात बोलण्यासारखे येथे बोलू नका, असे त्यांना बजावले असल्याची माहिती शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मठाची तयारी असताना वनताराचे केंद्र कशासाठी..?महादेवीसाठी मठ सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा देण्यास सक्षम आहे. तरीही वनतारा पुनर्वसन केंद्र का उभा करतो, असे म्हणते यावर बैठकीत चर्चा झाली. न्यायालयाने हत्तीण वनतारा येथे देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे न्यायालयात नकारात्मक आदेश आला तरी तांत्रिक मार्ग काढण्यासाठी वनताराचेच एक केंद्र येथे तयार आहे. आम्ही तेथे हत्तिणीला ठेवत आहे, असेही म्हणता येईल, म्हणून केंद्र उभारण्याचा पर्याय समोर आल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

महादेवी हत्तीणसाठी नांदणी मठ, सरकार, वनतारा संयुक्तपणे सर्वाेच्च न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्यावर एकमत झाले आहे. वनताराने नांदणी मठाच्या जमिनीत पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. तेथे हत्तिणीसाठीच्या सेवा, सुविधाही ते देण्यास तयार आहेत. - जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणी मठ.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागाने सुचविलेल्या जागेत महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असून, यासाठी वनतारा व्यवस्थापनाने राज्य सरकारला मदत करण्याची पूर्ण तयारी दर्शविली आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVantaraवनतारा