शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

वळिवडेकरांची एक साथ; महापुरावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:18 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीकाठाशेजारील आणि गांधीनगरसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठेलगत असणाऱ्या ‘वळिवडे’ (ता. करवीर) या गावालाही पुराचा प्रचंड मोठा फटका बसला. ऊस शेती आणि धनधान्यांनी भरलेली घरे पाण्यात गेली. संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. गावकऱ्यांपुढे ‘त्या’ आठ दिवसांत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. पूर ओसरल्यानंतर गावात परतलेल्या गावकºयांनी डोळ्यांतील आसवांना थांबविले. लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांत गावगाडा पुन्हा सुरळीत आणला.पंचगंगाकाठी १३ हजार लोकसंखा असलेल्या या गावाला १९८९ व २००५ या दोन वेळेला पुराचा तडाखा बसला होता. त्यानंतर या गावात महापूर काय असतो, याची अनुभूती २०१९ साली आली. ग्रामपंचायतीसह बहुतांश गावांत १० ते १२ फूट पाणी होते. वेगाने वाढणाºया पाण्यामुळे १५०० कुटुंबांना फटका बसला. त्यातील निम्म्याहून अधिक गावकºयांना संजय चव्हाण यांच्या अपार्टमेंटमध्ये, तर काहीजणांना जवळील शाळांचा आधार घ्यावा लागला. याशिवाय काही नागरिकांची सिंधी समाजाने निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, आदी ठिकाणी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती. पुरामुळे कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर या शाळाही पाण्यात राहिल्या. एवढे सगळे होऊनदेखील गावकºयांनी काही हार मानली नाही.घरे पडली : पिके कुजलीवळिवडेतील ५७१ हेक्टर जमीन शेतीखाली आहे. मुख्य पीक ऊसच आहे. शेतीबरोबर पशुपालन हा व्यवसाय आहे. दूध व गांधीनगरच्या व्यापारपेठेमुळे या गावाला काही प्रमाणात सुबत्ता आली आहे. गावातील बहुतांश युवक शेतीबरोबर गांधीनगर येथील दुकानांमध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत. गावची लोकसंख्या १३००० इतकी आहे; तर जनावरे ६००हून अधिक आहेत. ५७१ पैकी ४०० हून हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने उसासह सोयाबीन कुजले आहे. त्यामुळे यंदा आर्थिक फटका मोठा बसणार हे गृहीत धरून येथील अनेक कुटुंबे कामाला लागली आहेत. गावातील १५० वर्षांपूर्वीच्या राम मंदिरातही प्रथमच पाणी भरले होते. शेजारीच राहणाºया पिंटू गुरव, बबन गुरव, बापूसो गुरव यांचे तर संपूर्ण घर अतिवृष्टीत पडले आहे. त्यामुळे पुन्हा उभारणी करण्यासाठी या गुरव कुटुंबातील सर्वच उरलेसुरले साहित्य बाहेर काढण्यात दिवसभर मग्न झाल्याचे दृष्टीस पडले.अंदाज चुकलायापूर्वी आलेल्या पुरात केवळ दोन ते चार फुटांपर्यंत पाणी आले होते. यावेळी मात्र, दहा ते बारा फूट पाणी गेल्याने अनेक ज्येष्ठांचा अंदाज चुकला. परिणामी उंचावर असलेले साहित्य, धान्य भिजून गेले. यात तांदूळ, गहू, मका, आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.अनेकजण मंदिराच्या आश्रयालावळिवडे गावातील दिगंबर जैन मंदिरात अद्यापही चार कुटुंब आश्रयाला आहेत. त्यांना आमदार अमल महाडिक, ग्रामपंचायतीतर्फे जेवणाची व वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनेकजण शहरातील पाहुण्यांकडे राहण्यास गेले आहेत.गांधीनगरचाकाही भाग बाधितगांधीनगर सिंधी सेंट्रल पंचायतीमधील कोयना कॉलनी, माळवाडी परिसरातील काही घरे पूरबाधित झाली होती. यात ६० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. किमान १२५ कुटुंबे बाधित, तर ६०० लोकांना स्थलांतरित म्हणून हेमू कलाणी प्रायमरी स्कूल, निरंकारी मंडळ, प्रेम प्रकाश मंदिर, साईबाबा मंदिर, सिंधी बांधवांच्या मदतीने आसरा घ्यावा लागला. बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. पंचनाम्याचे काम सुरू आहे.