शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : वृद्धाश्रमात ...तरुणाईने जोपासली सामाजिक बांधीलकी ; पंगतीच्या जेवणाचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:18 IST

व्हॅलेंटाईन डे! प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे.

ठळक मुद्देआर. के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना गुलाबाची फुले भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व पैलवान प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॅलेंटाईन डे’

कोल्हापूर : व्हॅलेंटाईन डे !  प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. तरुणाईने व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण न करता व प्रेमी युगुलांपुरताच मर्यादित न ठेवता सामाजिक बांधीलकी जोपासत हा ‘प्रेम दिवस’ साजरा केला आहे. भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी व पैलवान प्रतिष्ठानतर्फे ‘व्हॅलेंटाईन डे’ आर. के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना गुलाबाची फुले देत व त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत आगळ्यावेगळ्या उपक्रमाने हा दिवस साजरा केला.आजकाल प्रत्येकजण पैशामागे धावत आहे. स्वत:च्या मुलांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला असताना, या वृद्धाश्रमातील वृद्धांशी त्यांचे कोणतेही ऋणानुबंध नसताना, भाजप क्रीडा जिल्हाध्यक्ष व पैलवान प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मोरे यांनी सामाजिक बांधीलकी जपत या वृद्धांसोबत वृद्धाश्रमात व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

प्रेम ही कधीच न बदलणारी संकल्पना असून, ती नेहमीच एका नव्या रूपात आपल्यासमोर येत असते. प्रेमाच्या बेधुंद लहरीत रंगणाºया प्रेमी युगुलांसाठी तर प्रेमाचा प्रत्येक दिवस नव्याने प्रेमात पाडणारा असतो. मात्र पोटच्या पोरांचेच आपल्या आईवडिलांवरील प्रेम आटत चालल्याने त्यांनी या वृद्धांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला.

या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या नशिबात कुठले आलेय प्रेम? अशी सल येथील वृद्धांच्या मनात असते. हेच दु:ख कमी करण्यासाठी व सामाजिक बांधीलकी जपत भाजपचे कार्यकर्ते व पैलवान प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी आर. के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.येथील वृद्धांना गुलाबाची फुले वाटत, त्यांना पंगतीच्या जेवणाची मेजवानी देत, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत मनसोक्त गप्पाही मारल्या. त्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे येथील वृद्ध भारावून गेले. त्यांच्या या सामाजिक बांधीलकीमुळे काही काळ येथील वृद्धांचे दु:ख हलके झाले. या उपक्रमात सचिन भोगम, रमेश हंकारे, संग्राम जाधव, राहुल वाले, सौरभ पाटील, सोन्या मोरे, मुरली पोळ, अक्षय कांबळे, चिनू वाले, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

गुलाबाचे फूल प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम साधन मानले जाते. व्हॅलेंटाईन डेदिवशी तरुण-तरुणी आवडत्या व्यक्तीला गुलाबाची फुले देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. वृद्धाश्रमातील या लोकांना मदत करणारे अनेकजण आहेत. मात्र त्यांना प्रेमाची गरज आहे. ही गरज ओळखून आम्ही हा उपक्रम केला. त्यांना फुले देऊन त्यांच्यासोबत पंगतीत बसून त्यांना जेवणाचा आनंद देत आम्ही घेतला.महेश मोरे,भाजप, जिल्हा क्रीडाध्यक्ष

 

 

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेkolhapurकोल्हापूर