शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीला वादळी पावसाने झोडपले, आंबा, काजू पिकांचे नुकसान; झाड पडून वीजवाहिन्या तुटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 12:07 IST

अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे

ठळक मुद्दे मांगवलीतील घटना :

वैभववाडी : सह्याद्री पट्ट्यासह संपूर्ण वैभववाडी तालुक्याला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाने पाऊण तासभर अक्षरश: झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्यामुळे मांगवलीत झाड कोसळून वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे काही काळ वाहने अडकली होती. तर या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सकाळपासूनच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. उकाड्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास सह्याद्री पट्ट्यात विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच वादळासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.वादळाचा फटका सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावांना बसला असण्याची शक्यता आहे. तालुक्यातील करूळ, सडुरे, नावळे, सांगुळवाडी, कुर्ली, वैभववाडी, कुंभवडे, कुसूर, भुईबावडा, वैभववाडी, खांबाळे, आचिर्णे, लोरे परिसराला पावसाने झोडपून काढले. तासभर झालेल्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचल्याचे दिसून येत होते.

अनेक भागातील मळ्यांमध्ये ऐन उन्हाळ्यात पाणी साचल्याचे पहायला मिळाले. वातावरणातील बदलामुळे घटलेले उत्पादन व पडलेल्या दरामुळे अगोदरच सकंटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे या पावसामुळे आणखीच नुकसान होणार आहे. त्याचबरोबर हापूस आंब्याचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.

वाहने अडकलीअरुणा पुनर्वसन गावठाणापासून एक किलोमीटर अंतरावर मांगवली-वेंगसर मार्गावर झाड कोसळल्याने वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे या मार्गावरील वाहने काही काळ अडकून पडली होती. वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांनी कोसळलेल्या झाडासह तुटलेल्या वीजवाहिन्या बाजूला करून मार्ग खुला केला. दरम्यान, वादळी वाºयाचा फटका संपूर्ण तालुक्यातील विविध भागाला बसला आहे.

 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसmahavitaranमहावितरण