कोल्हापूर जिल्ह्यासह टोप व परिसरात महसूल विभागाकडून गौण खनिज, क्रश सॅन्ड,खडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अन्यायकारक कारवाई केली जात आहेे. वाहने ताब्यात घेऊन भरमसाठ अन्यायी दंड आकारणी केली जात आहे. प्रसंगी कारवाईच्या भीतीपोटी मोठ्या रकमा वसूल केल्या जात आहेत.
यामुळे क्रशर व्यावसाईक वाहनचालक संकटात सापडले आहेत. या अन्यायी कारवाई विरोधात मी वडार महाराष्ट्राचा व टोप क्रशर खाण डंपर असोशिएशन यांच्या वतीने सोमवार दि १ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे गाढव व डंपरसह कुटुंब धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी रमेश पवार, संभाजी पवार, रंगराव भोसले, अविनाश कलगुटगी, मोहन पाटील, हनुमंत पाटील, विश्वनाथ पाटील, दादासो शिंदे, सागर मगदूम, रवि काशिद, विक्रम पाटील, विशाल पाटील, सुरेश चौगले, मारुती शिंगाडे,विलास नलवडे, सरदार पाटील,साई लोले, भरत डोंगरे, दीपक शिंदे, महेश पाटील, अर्जुन पवार आदी उपस्थित होते.