कोल्हापूर : महानगरपालिका मार्फत गुरुवारी अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे ३,१५७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वर्कर व फ्रंटलाईन वर्कर २६, १८ ते ४५ वर्षापर्यंत २,३०६, ४५ ते ६० वर्षापर्यंत ५५३, तर ६० वर्षांवरील २७२ नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे.
आज, शुक्रवारी १८ वर्षांवरील कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या नागरिकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदरबाजार, सिध्दार्थनगर, भगवान महावीर दवाखाना या केंद्रावर कोविशिल्डचा दुसरा डोस तर कसबा बावडा, मोरेमाने नगर व कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखाना या केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.