लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेण्याची परवानगी दिल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाची सरासरी वाढली आहे. गेले दोन दिवस १८ हजारांवर असणारी सरासरी शनिवारी २८ हजारांवर गेली आहे. दिवसभरात विविध गटातील २६ हजार ७२३ जणांनी लसीकरण करून घेतले असून, यामध्ये ४५ वर्षांवरील १४,३६८ नागरिकांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील २३५ आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद प्रशासन, ४५ वर्षांवरील नागरिक आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अशा चार टप्प्यात सध्या लसीकरण सुरू आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेने आता वेग घेतला असून, अजूनही तीन दिवस पुरेल एवढी लस जिल्ह्यात उपलब्ध आहे.
चौकट
आतापर्यंत पहिला डोस घेतलेले नागरिक ३ लाख ८४ हजार ४९३
दुसरा डोस घेतलेले नागरिक २६,०७३
शनिवारी पहिला डोस घेतलेले नागरिक २६,७२३
शनिवारी दुसरा डोस घेतलेले नागरिक १,३४१
शनिवारी पहिला डोस घेतलेले ४५ वर्षांवरील नागरिक १४,३६८
४५ वर्षांवरील पहिला डोस घेतलेले एकूण नागरिक ८३,६७२
चौकट
आजही लसीकरण सुरू
रविवारी शासकीय सुट्टी जरी असली तरीही लसीकरणाचे काम थांबणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शिस्तबद्धरितीने नजीकच्या आरोग्य केंद्रावर जावून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे आणि लसीकरण मोहीम समन्वयक डाॅ. फारूक देसाई यांनी केले आहे.