शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

प्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर करा  :कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 5:31 PM

कोल्हापूर शहरात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी येणाऱ्या काळात प्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर करा  :कलशेट्टी हॉटेल व्यावसायिक बैठकीत आवाहन

कोल्हापूर : शहरात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी येणाऱ्या काळात प्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे केले.कोल्हापूर हॉटेल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीबाबतच्या बैठकीत आयुक्त कलशेट्टी मार्गदर्शन करीत होते. असोसिएशनचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी आयुक्तांचे स्वागत केले. तसेच प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी हॉटेल असोसिएशन सहकार्य करील, असे आश्वासन दिले.हॉटेल व्यावसायिकांनी महापुराच्या काळात दिलेल्या योगदानाबद्दल आयुक्त कलशेट्टी यांनी आभार व्यक्त केले. यापुढे शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.‘सह्याद्री’चे मालक सुशांत पै यांनी प्लास्टिक बंदीमुळे हॉटेल व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींविषयी माहिती दिली.

पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड यांनी प्लास्टिकबाबतच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती दिली. अनिल चौगुले यांनी प्लास्टिक वापराला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा वापर वाढवावा, तसेच जुन्या काळात जेवणासाठी ताट म्हणून वापरण्यात येणाऱ्या पळसाच्या पाणाच्या पत्रावळ्या, केळीची पाने यांचा वापर मानवाच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, याची माहिती दिली. असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन शानबाग यांनी आभार मानले.यावेळी बाळ पाटणकर यांच्यासह हॉटेल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक, माहिती, शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार व पर्यावरण अधिकारी अपेक्षा सूर्यवंशी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका