शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर एकेरी वाहतूक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 15:49 IST

RoadTransport, road safety, kolhapur, traffic police गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अगर दिवसा एकेरी करावा, अशी मागणी आखरी रस्ता कृती समितीतर्फे केली. मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे देऊन चर्चा केली.

ठळक मुद्देगंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर एकेरी वाहतूक कराआखरी रास्ता कृती समितीची मागणी अनिल गुजर यांच्याशी केली चर्चा

कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील ड्रेनेजचे काम पूर्ण होईपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा अगर दिवसा एकेरी करावा, अशी मागणी आखरी रस्ता कृती समितीतर्फे केली. मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांच्याकडे देऊन चर्चा केली.गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे अनेक वर्षे प्रलंबित काम जनआंदोलनाने सुरू झाले. सध्या शुक्रवार गेट ते शिवाजी पूल या रस्त्याचे काम सुरू आहे. येथील ड्रेनेजचे काम सध्या सुरू आहे. पोलीस प्रशासनाकडून या मार्गावरील अवजड वाहतूक व ऊस वाहतूक बंद केली, त्याचे नागरिकांतून स्वागत होत आहे; पण रात्रीच्या वेळेला अगर शहर वाहतूक पोलीस नसताना किंवा सकाळी सहानंतर येथून ऊस वाहतूक सुरू असते.

अशी अवजड वाहने रस्त्यावरून जात असल्याने रस्त्यावरील पाईपलाईन फुटू लागल्या आहेत. त्यातच ड्रेनेज लाईन दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यामुळे गंगावेश ते शिवाजी पूल हा मार्ग वाहतुकीसाठी दिवसा एकेरी करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात किशोर घाटगे, राकेश पाटील, महेश कामत, रियाज बागवान, आदींचा समावेश होता. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूरtraffic policeवाहतूक पोलीस