शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: IPS लिहिलेली फुलांनी सजवलेली जीप, हातात काठी, खांद्यावर घोंगडं; ढोल, हलगी वाजवत बिरदेव डोणेंच मूळगावी जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:55 IST

बिरदेवच्या स्वागताला जनसागर लोटला, ..अन् बिरदेव ढसाढसा रडला..!

मुरगूड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशात ५५१ वी रँक मिळवणारा यमगे येथील बिरदेव सिद्धाप्पा डोणे रविवारी मूळगाव यमगेमध्ये आला. बिरदेवच्या यशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी मुरगूडपासून यमगेपर्यंत जंगी मिरवणूक काढली. सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाच्या कौतुकासाठी जनसागर लोटला होता. येथील शिवतीर्थपासून सकाळी आठ वाजता सुरू झालेली मिरवणूक तब्बल सहा तास चालली. बिरदेव यांच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने बिरदेव व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.यूपीएससी परीक्षेचा निकाल २२ एप्रिलला दुपारी लागला. त्या दिवशी बिरदेव बेळगावजवळील भवानीनगर येथे माळावर आपल्या मामाच्या बकऱ्यांत रमला होता. गावकऱ्यांनी फोनवरून बिरदेवचे कौतुक करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी बिरदेवच्या स्वागताची तयारी सुरू केली, पण बिरदेवने सैन्यात असलेला भाऊ वासुदेव येत नाही, तोपर्यंत गावात येणार नसल्याची इच्छा व्यक्त केली आणि रविवारी बिरदेव भावासह गावात आला आणि ग्रामस्थांनी मिरवणूक काढली.सकाळी बिरदेव कर्नाटकातील झोडकूरळी या आपल्या बहिणीच्या गावाहून मुरगूडमधील शिवतीर्थ येथे दाखल झाला. प्रारंभी औक्षण केल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये बिरदेव आपले आई बाळाबाई, वडील सिद्धाप्पा, भाऊ, बिरदेव, बहीण व अन्य नातेवाईक होते. मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती. ही मिरवणूक यमगे एसटी स्टँड येथे आली. यमगेच्या प्रवेशद्वारात जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अंबाबाई, डोमरीन व बिरोबा मंदिरांचे दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर मिरवणुकीची सांगता झाली. बिरदेवच्या कौतुकासाठी धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.भावासाठी मिरवणूक थांबवलीबिरदेव आपल्या आई-वडील व अन्य नातेवाइकांसह मिरवणुकीसाठी सजवलेल्या जीपमध्ये चढला. मिरवणूक सुरू होणार इतक्यात आपला भाऊ वासुदेव जोपर्यंत गाडीत येत नाही तोपर्यंत बिरदेव यांनी मिरवणूक सुरू करू नका, असे आवाहन केले. अर्धा तासाने भाऊ आल्यानंतर मिरवणूक सुरू झाली.

..अन् बिरदेव ढसाढसा रडला..!मिरवणूक यमगेच्या प्रवेशद्वारात आली. याठिकाणी अबाल वृद्धांसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. स्वागतासाठी इतकी प्रचंड गर्दी पाहून बिरदेवला गहिवरून आले आणि तो गावात प्रवेश करताना ढसाढसा रडला.

कंबरेला ढोल बांधत बिरदेवने ढोल वाजवलाबिरोबा मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर देवदर्शन घेतल्यानंतर स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात ढोल वादक उपस्थित होते, त्यांच्यामध्ये जात बिरदेवने बिरोबाच्या नावांनं चांगभलं म्हणत ढोल कंबरेला बांधला आणि ढोल वाजवला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोग