शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
4
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
5
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
6
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
7
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
8
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
9
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
10
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
11
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
12
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
13
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
14
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
15
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
17
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
18
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
19
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
20
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर

असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीला आता चाप, उच्च न्यायालवाचे कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:55 IST

क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे. या निर्णयानुसार १६ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी  दिली.

ठळक मुद्देअसुरक्षित विद्यार्थी वाहतुकीला आता चाप, उच्च न्यायालवाचे कारवाईचे आदेशप्रादेशिक परिवहनकडून शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र; रिक्षातून विद्यार्थी वाहतूक बेकायदेशीर

कोल्हापूर : क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशी वाहतूक रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने अशी असुरक्षित वाहतूक रोखण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयास दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांनाही पत्र दिले आहे. या निर्णयानुसार १६ वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी  दिली.राज्यात सुरू असलेल्या असुरक्षित विद्यार्थी वाहतुकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल आहे. याची सुनावणी काही वर्षांपासून सुरू आहे. याचिकेतील एका निर्णयाची माहिती देताना डॉ. अल्वारिस म्हणाले, केंद्र सरकारने स्कूल बससाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार एका छोट्या मिनी बससाठी १३ विद्यार्थीक्षमता आहे. बसचे आवरण टणक असावे, विद्यार्थ्यांना घरापासून बसमध्ये घ्यावे, त्यांना शाळेच्या आवारात सोडावे, बसमध्ये शाळेचा कर्मचारी असावा, अशा अटी व शर्ती लागू केल्या आहेत.केंद्र सरकारने रिक्षांसाठी विद्यार्थी वाहतुकीचा परवाना देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे २०१७ पासून राज्यात आरटीओ विभागाने एकाही रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीचा परवाना दिलेला नाही. मात्र, राज्यात सर्वत्र रिक्षांमधून असुरक्षित विद्यार्थी वाहतूक सुरू असल्याने न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, गेल्या चार दिवसांत १६ असुरक्षित वाहनांवर कारवाई दंडात्मक केली. ती यापुढेही सुरू राहणार आहे. यापुढील सुनावणी १७ डिसेंबरला होणार आहे. त्यात काय कारवाई केली याचा अहवाल देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यासंबंधी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थी वाहतुकीचा परवाना नसलेल्या वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करू देऊ नये. शाळांनी स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची मदत घेऊन सुरक्षित स्कूल बसची व्यवस्था करावी, अशा सूचना पत्राद्वारे दिल्या आहेत.

याची अंमलबजावणी न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यामुळे रिक्षासह अन्य असुरक्षित वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करण्याचा विषय शाळा व्यवस्थापन, पालक आणि वाहनधारकांसाठी चिंतेचा बनला आहे. यासंबंधी उद्या, शनिवारी जिल्हा रस्ते सुरक्षासंबंधी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.प्रबोधनाबरोबर कारवाईचा बडगाअशी वाहतूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहनकडून वाहनधारकांचे प्रबोधन केले जात आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांत तीनशेहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात १६ वाहने दोषी आढळली. त्यांच्याकडून तीन लाख ३६ हजार दंड वसूल केला, अशी माहितीही डॉ. अल्वारिस यांनी दिली.जिल्ह्यात दोन हजार रिक्षांमधून विद्यार्थ्यांची ने-आणजिल्ह्यात सुमारे १५ हजारांहून अधिक रिक्षांची नोंद आहे. त्यांतील दोन हजार रिक्षांमधून विद्यार्थी वाहतूक केली जात आहे. स्कूल बस पालकांच्या खिशाला परवडत नसल्याने पालक अशा रिक्षांना प्राधान्य देत आहेत. विशेषत: गतीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक केल्याने समतोल साधता येत नाही. ही वाहतूक असुरक्षित असून, कधीही विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते; म्हणूनच या वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर