शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम अशक्यच : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 15:30 IST

साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे १५५ रुपये अनुदान म्हणून परत करावेत, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देअनुदानाशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम अशक्यच : हसन मुश्रीफकमी दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराच

कोल्हापूर : साखरेचा उठाव ठप्प झाल्याने यंदा साखर उद्योग पुरता संकटात सापडला असून आता राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. कारखान्यांना कर्जे नको अनुदान दिल्याशिवाय येणारा हंगाम सुरू होणे अशक्य आहे. ‘जीएसटी’पोटी केंद्र सरकारने घेतलेले पोत्यामागे १५५ रुपये अनुदान म्हणून परत करावेत, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बँकेकडील ११ साखर कारखान्यांच्या साखर विक्री आदेशानुसार १२५ ते १५० कोटी रुपये येत होते, पण साखरेला मागणीच नसल्याने त्यातून ५ टक्केही पैसे आलेले नाहीत. याचा फटका केवळ कारखान्यांना नाही, तर बॅँकांनाही बसत आहे. जिल्ह्यातील ८ कारखान्यांनी एक कणही साखरेची विक्री अद्याप केलेली नाही, कसा व्यवसाय करायचा? येणाऱ्या हंगामापर्यंत देशात १८५ लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. नवीन साखर उत्पादन सुरू झाले तर ठेवायचे कोठे? इथेनॉलचा पर्याय चांगला असला तरी त्या मशिनरी उभारण्यासाठी कर्जे कोण देणार? त्यामुळेच सरकारने आता हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.यापूर्वीच्या तीन हंगामातील कर्जाचे हप्ते द्यायचे आहेत, त्याशिवाय आगामी हंगामाच्या तयारीसाठी कर्जे घ्यावी लागणार आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा कर्जे घेणे शक्य नसून आता अनुदान म्हणूनच पैसे द्यावे.

कमी दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई कराचकाही कारखाने कमी दराने साखर विक्री करतातच त्याशिवाय कोट्यापेक्षा अधिक विक्री करत असल्याने बाजार अस्थिर झाला आहे. अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊच नये, अशी मागणी साखर आयुक्तांकडे केल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूरHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफ