शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत महामॅरेथॉन’ ला अभूतपूर्व प्रतिसाद; ‘सोशल मीडिया’वर धूम; दिवसभर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 17:44 IST

‘विन्टोजीनो’ प्रस्तुत आणि माणिकचंद आॅक्सीरिच, ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कडाक्याची थंडी असतानाही रविवारी (दि. ६) पहाटे धाव घेऊन, कोल्हापूरकरांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी साद दिली. या महामॅरेथॉनच्या ‘लोकमत’च्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे, मॅरेथॉनदिवशी टिपलेली छायाचित्रे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.

ठळक मुद्दे‘सोशल मीडिया’वर धूम; दिवसभर चर्चाधावपटू, कोल्हापूरकरांमध्ये उत्साह

कोल्हापूर : ‘विन्टोजीनो’ प्रस्तुत आणि माणिकचंद आॅक्सीरिच, ट्रेडनेट वेल्थ सहप्रायोजक असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कडाक्याची थंडी असतानाही रविवारी (दि. ६) पहाटे धाव घेऊन, कोल्हापूरकरांनी सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी साद दिली. या महामॅरेथॉनच्या ‘लोकमत’च्या अंकात सोमवारी प्रसिद्ध झालेल्या बातम्या, छायाचित्रे, मॅरेथॉनदिवशी टिपलेली छायाचित्रे अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला.शिस्तबद्धता, जल्लोषी वातावरण, उत्कृष्ट नियोजनामुळे ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी कोल्हापूरकर आणि धावपटूंनी या स्पर्धेचा आनंद लुटला. त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसून आला. या महामॅरेथॉनचे नियोजन, संयोजनाबाबतधावपटू, नागरिक आणि मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या मॅरेथॉनमध्ये स्पर्धक, त्यांचे पाठीराखे आणि प्रेक्षक म्हणून सहभागी झालेले धावपटू, खेळाडू आणि नागरिकांनी महामॅरेथॉनच्या मार्गावर आणि पोलीस ग्राऊंडमध्येआपापले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसह टिपलेली छायाचित्रे, घेतलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘लोकमत’मधील महामॅरेथॉनच्या बातम्या, छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट आणि शेअर केली; त्यामुळे सोशल मीडियावर महामॅरेथॉनची सोमवारी धूम राहिली.कोल्हापूरमध्ये दिवसभर महामॅरेथॉनची चर्चा सुरू राहिली. दरम्यान, या स्पर्धेचे परीक्षण कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स् असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांनी केले. त्यामध्ये असोसिएशनचे अध्यक्ष आर. बी. पाटील, सचिव सुरेश फराकटे, एस. व्ही. सूर्यवंशी, आर. व्ही. शेडगे, पी. एम. पाटील-मांगोरे, कृष्णात लाड, विजय मळगे, अमोल आळवेकर, राहुल मगदूम, महेश सूर्यवंशी, सीमा सूर्यवंशी, अभिषेक भोपळे, नवनाथ पुजारी, विक्रम शेलार, लहु अंगज, युवराज मोळे, राहुल डिग्रजे, जगन्नाथ पोतदार, नरेंद्र वरूडकर, जालेंद्र मेढे, सचिन कोरवी, अभिजित पोवार, सत्यश्री सुतार, मनुकर समर्थ, डी. सी. पाटील, डी. के. रायकर, संकेत पाटील, बळीराम पाटील, ए. ए. कांबळे, विश्वास जगदाळे, चिन्मय जोशी, निखिल भारती, संजय पाटील, साताप्पा चव्हाण, संजय गाडेकर, भाऊसो बाबर, जितेंद्र वसगडेकर, अविनाश बोडके, प्रवीण पडवळ, शुभम पाटील, निखिल चौगुले, संदीप खोत, आकाश जाधव, धनंजय सावंत, अमित दलाल, मानसिंग मांगोरे, उदय पाटील, व्यंकटेश अपगोळ, प्रशांत शेटके, सूरज मगदूम यांचा समावेश होता.

‘लोकमत महामॅरेथॉन’ ही खेळाडू, नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेची तारीख निश्चित व्हावी, अशी अपेक्षा खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.- डॉ. सुरेश फराकटे,सचिव, कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर अ‍ॅथलेटिक्स् असोसिएशन.

 

 

टॅग्स :Lokmat Kolhapur Maha Marathonलोकमत कोल्हापूर महामॅरेथॉनkolhapurकोल्हापूर