शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोबाईल कंपनीचा अनलिमिटेड पॅक लिमिटेड, नवीन दराची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 11:35 IST

मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा एक हजार मिनिटांनंतर जादा पैसे मोजावे लागणार

विनोद सावंत

कोल्हापूर : मोबाईल कंपनीच्या बदलेल्या दरामुळे ‘अनलिमिटेड पॅक’ योजना आता मोडीत निघाली आहे. ‘कंपनी टू कंपनी कॉलिंग’ मोफत राहणार असले तरी इतर कंपनीच्या मोबाईल ग्राहकांशी बोलण्यास मर्यादा आल्या आहेत. महिन्याला एक हजार मिनिटेच मोफत कॉलिंग करता येणार आहे. त्याच्यावर बोलण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर अनलिमिटेडचे पॅक सुमारे ५० रुपयांनी महाग झाले आहेत. नवीन दराची सोमवारी रात्री १२ पासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.मोबाईल कंपन्यांमध्ये टोकाची स्पर्धा आहे. एकमेकांच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. मोबाईल नंबर न बदलता दुसऱ्या कंपनीचे ग्राहक होण्यासाठीची पोर्टेबिलिटी योजना आल्यामुळे तर स्पर्धा कमी होण्याऐवजी वाढली. गेल्या काही वर्षांपासून या योजनेमुळे कंपनीची ग्राहक संख्या जर वाढली असली तरी तोट्यात मात्र, वाढ होत राहिली.

अखेर सरकारची मंजुरी घेऊन दरवाढीचा निर्णय घेण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासूनच कॉल आणि इंटरनेटच्या दरात ४० ते ५० टक्के वाढ झाली आहे. परिणामी पहिल्यांदा सवय लावायची आणि नंतर दरवाढ करायची या कंपनीच्या खेळीमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनलिमिटेड पॅकचे पूर्वीचे दर           बदललेला दर

१९९ रुपये (२८ दिवस)                      २४९ रुपये३९९ रुपये (८४ दिवस)                      ५९९ रुपयेदुसऱ्या कंपनीच्या ग्राहकांची बोलण्याची मर्यादा - एक हजार मिनिटे

एकदा अनलिमिटेड पॅक मारल्यानंतर महिन्यात अथवा तीन महिन्यांच्या पॅकनुसार कोणाशीही कितीही वेळ बोलता येत होते. त्यामुळे ग्राहकांचा कल अनलिमिटेड पॅक घेण्याकडेच होता. आता इतर कंपनीच्या ग्राहकांना आवश्यकतेनुसारच बोलावे लागणार आहे. त्यामुळे नवीन नियमांमुळे ग्राहकांतून नाराजी व्यक्त होत आहे.- गणेश कुष्ठे, मोबाईल रिचार्ज विके्रता

रिचार्ज मारणाऱ्यांच्या व्यवसायात वाढ होणारनवीन नियमामुळे कंपनीचा तोटा कमी होणार आहे तर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुसरीकडे रिचार्ज मारणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत. ‘अनलिमिटेड पॅक’चे दर वाढल्यामुळे तसेच एक हजार मिनिटांनंतर पुन्हा रिचार्ज मारावे लागणार असल्यामुळे रिचार्ज मारणाºयांच्या व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. 

 

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर