शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा विद्यापीठाचा ‘मानस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:37 IST

प्रदीप शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य ...

प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये आयुष्यभराची कमाई पाण्यात वाहून गेल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचा ‘मानस’ शिवाजी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे. मानसशास्त्र अधिविभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील विविध कॉलेजमध्ये शिकणारे ‘मानसशास्त्र’चे एम.ए. भाग दोनचे विद्यार्थी पूरग्रस्तांचे समुपदेशन करणार आहेत.विद्यापीठात मानसशास्त्र अधिविभागाच्या वतीने नुकतीच ‘पूरगस्तांचे समुपदेशन’ कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील महावीर, राजाराम महाविद्यालय, सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, केबीपी कॉलेज (इस्लामपूर), एसजीएम कॉलेजचे (कºहाड) मानसशास्त्र विषयाचे विद्यार्थी सामील झाले होते. या विद्यार्थ्यांचा गट पूरबाधित गावांत जाऊन संवाद साधणार असून, पूरग्रस्तांंच्या मानसिकतेचे आकलन करणार आहेत. यानंतर हे विद्यार्थी संबंधितांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी ‘आरईबीटी’ या थेरपीचा वापर करणार आहेत. हा उपक्रम दर शनिवारी व रविवारी राबविला जाणार आहे. यामध्ये १०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, मानसशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. भारती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिविभागातील प्रा. डॉ. अश्विनी पाटील, प्रा. अमोल कांबळेंसह डॉ. भरत नाईक (महावीर कॉलेज), डॉ. विकास मिणचेकर (केडब्लूसी), डॉ. घन:शाम कांबळे (एबीपी कॉलेज), प्रा. स्वाती मोरकर (एसजीएम), प्रा. विजय मुतनाळे (राजाराम कॉलेज) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेशनविद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ‘पूरग्रस्तांचे समुपदेशन’कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेले ‘मानसशास्त्र’चे विद्यार्थी हे पूरबाधित गावात जाऊन शाळेतील मुले, तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, आदींशी संवाद साधणार आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. यावेळी त्यांच्यावरील ताण-तणावांचेही आकलन करून ‘आरईबीटी’ थेरपीच्या आधारे समुपदेश करणार आहेत.पूरग्रस्तांमधील लक्षणेभीती, निद्रानाश, झोप नीट न लागणे, छातीमध्ये धडधड वाढणे, उदासीनता ही लक्षणे प्रामुख्याने पूरग्रस्तांमध्ये दिसतात. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता असते.