शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

नवचैतन्यमध्ये झाला अनोखा विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST

घन:शाम कुंभार यड्राव: दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेली एखादी बातमी जीवनात शिक्षणापासून विवाहापर्यंत जाऊन स्थिरता मिळवून देते. याचा प्रत्यय येथील ...

घन:शाम कुंभार

यड्राव: दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेली एखादी बातमी जीवनात शिक्षणापासून विवाहापर्यंत जाऊन स्थिरता मिळवून देते. याचा प्रत्यय येथील नवचैतन्य अनाथालयच्या परिसराने अनुभवला. ‘लोकमत’च्या एक बातमीने निराधार इंद्रजीत पाटील अभियंता बनला व गरीब घरातील आईचे छत्र हरवलेल्या ‘भारती’ या युवतीबरोबर विवाहबद्ध झाला. या अनोख्या विवाह सोहळ्यात अनाथालयाचे संस्थापक वरपिता बनले. तर शासकीय अधिकारी व-हाडी झाले.

नवचैतन्य अनाथालयमधील इंद्रजीत पाटील याने दहावीला चांगले गुण प्राप्त केल्यावर अभियंता बनण्याची इच्छा ‘लोकमत’मधील बातमीतून प्रकट झाली. त्याची दखल घेऊन शरद इन्स्टिट्युटने त्याच्या डिप्लोमा डिग्री शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतल्याने त्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर तो पुणे येथील कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे.

सर्वसामान्य घरातील व आईचे छत्र हरवलेल्या ‘भारती’ युवतीशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय त्याने घेतला. हा मंगल सोहळा नवचैतन्य बालगृहाच्या परिसरात संपन्न झाला. बालगृहाचे संस्थापक भीमराव आव्हाड वरपिता बनले. तर संतोष घोटगे यांनी विवाहाचे आयोजन केले. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे अतीश शिंदे व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा वैशाली हिंगमिरे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या प्रियदर्शनी चोरगे, शमशुद्दीन शेख, अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांच्यासह मान्यवर या विवाह सोहळ्यात व-हाडी बनले.

चौकट - ‘लोकमत’मुळे जीवन प्रवास सुखकर

दैनिक ‘लोकमत’मुळे मला शरद इन्स्टिट्युटने डिप्लोमा, डिग्रीचे शिक्षण मोफत दिले. यामुळे माझे जीवन स्थिरस्थावर बनले. नवचैतन्य बालगृहाचे भीमराव आव्हाड व संतोष घोटगे यांनी माझ्यावर कृपाछत्र राखल्याने माझा जीवन प्रवास सुखकर बनला, अशी कृतज्ञता इंद्रजीत पाटील याने व्यक्त केली.

फोटो - ११०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी - नवचैतन्य बालगृहामध्ये इंद्रजीत व भारती यांच्या विवाहाप्रसंगी शासकीय अधिकारी यांनी व-हाडी बनून शुभेच्छा दिल्या. (छाया-घन:शाम कुंभार, यड्राव)