शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

शिवनिष्ठा ग्रुपची गड संवर्धन मोहीम-कोल्हापूरच्या युवकांचा अनोखा उपक्रम : किल्ले- स्मारकांची स्वच्छता; जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 00:08 IST

येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून,

ठळक मुद्देस्मारकांची स्वच्छता

शेखर धोंगडे।कोल्हापूर : येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून, दर महिन्याला हे सर्व शिवप्रेमी प्रसिद्धीपासून दूर राहत सामाजिक बांधीलकी जपत कर्तव्य पार पाडत आहेत.

आजपर्यंत या शिवप्रेमी सदस्यांनी महिन्यातून एकदा पन्हाळगड, कळंबा तलाव, शहरातील स्मारक यांची स्वच्छता केली आहे. सद्य:स्थितीवर त्यांनी पन्हाळगड व किल्ले संवर्धन मोहीम राबविण्यावर लक्ष केंद्रित केले असून, ‘किल्ले काल, आज व उद्या’ यासंबंधीची जनजागृती तरुणांमध्ये करीत आहेत.

पन्हाळानजीकचा पावनगड आजही दुर्लक्षित असून, पर्यटक केवळ पन्हाळा पाहून पुढील प्रवासाला निघतात म्हणून येथे पावनगडसंबंधीची माहिती समजावी म्हणूनही प्रयत्न सुरू आहेत.यावेळी बॅनर लावून जनजागृतीचे संदेश देणे, किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक तसेच हुल्लडबाजी करणाºयांना सूचना देणे, पोलिसांच्या मदतीने पार्ट्या करणाºयांवर नियंत्रण आणणे अशीही मोहीम हे शिवप्रेमी राबवीत आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रतिकृतीयंदाच्या वर्षीही दुचाकीच्या दर्शनी भागावर किल्ल्याची सुंदर आकर्षक प्रतिकृती तयार करून हँडेलवर शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून ही दुचाकी संपूर्ण जिल्ह्यातून फेरफटका मारत आहे. यावेळी त्यांनी दुचाकीवर किल्ले संवर्धन करूया असे संदेश देताना पूर्वीचे गड, आताचे गड व नंतरचा गड असा प्रतीकात्मक किल्ला लावला आहे. गाडीच्या मागे डौलाने भगवा फडकविला जात आहे .गेल्यावर्षीही प्रतापगडची प्रतिकृती यातील एका सदस्याने तयार करून संपूर्ण शहरभर फेरफटका मारला होता.

प्रसिद्धीपासून दूर राहत शिवनिष्ठा ग्रुपने ने आपली मोहीम सातत्यपूर्ण सुरु ठेवली आहे. केवळ शिवरायांच्या प्रेमापोटी व त्यांनी किल्ल्यांच्या माध्यमातून दिलेला मोठा ठेवा जपला जावा, त्याची जागृती व्हावी हाच त्यांचा उद्देश असून यासाठीच ध्येयवेडे होऊन कर्तव्य पार पाडण्याचा छोटासा प्रयत्न करीत असल्याचे त्यांचे सदस्य नामोल्लेख न करता सांगतात. केवळ शिवनिष्ठा ग्रुप यातच सर्व काही आहे असेही ते अभिमानाने सांगतात. ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे असेल त्यांनाही यामध्ये सामावून घेऊ असेही त्यांनी आवाहन केले आहे.

 

 

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूर