शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच कृती समितीचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 19:46 IST

Petrol Kolhapur- पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. ९९ रुपयांवर पेट्रोल गेल्याने वाहनचालकाला ते खरेदी करणे शक्य होत नसल्याने मोटरसायकलनेच फास लावून घेतल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवाढ तात्काळ मागे घ्या, अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.

ठळक मुद्देमोटरसायकलने घेतला फास लावूनपेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात मोदी सरकारचा निषेध

कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या विरोधात शहर व जिल्हा नागरी कृती समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. ९९ रुपयांवर पेट्रोल गेल्याने वाहनचालकाला ते खरेदी करणे शक्य होत नसल्याने मोटरसायकलनेच फास लावून घेतल्याचे प्रतिकात्मक आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध केला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवाढ तात्काळ मागे घ्या, अशा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.यामध्ये म्हटले आहे की, स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोल, डिझेल हे इंधन मानवी जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. या वस्तू असल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. असे असताना पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९९ व डिझेलचा दर ९० रुपयांच्या पुढे, तर स्वयंपाकाचा गॅस ८०० रुपयांच्या आसपास असून हे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत.

गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक अडचणीत आहे. दरवाढ जगणं असाहाय्य करणारी आहे. त्यांच्यामध्ये असंतोष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवाढ कमी करण्यासंबंधी काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे किंवा गगनाला भिडलेली दरवाढ त्वरित सामान्य जनतेला परवडेल अशा पध्दतीने करावी.यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, रणजित पवार, विनोद डुणूंग, चंद्रकांत पाटील, श्रीकांत भोसले, किशोर घाटगे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Petrolपेट्रोलcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर