शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 19:01 IST

OBC Reservation Kolhapur : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी जनमोर्चा, ओबीसी सेवा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देस्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवा करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत ठेवा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी जनमोर्चा, ओबीसी सेवा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायब तहसीलदार बिपीन लोकरे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे. पदोन्नतीमधील ओबीसीचे आरक्षणही संपवण्यात आले आहे. यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे. सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ओबीसी समाजाच्या सवलतींचा मुद्दा आल्यानंतर त्यांची लोकसंख्या किती असा प्रश्न उपस्थित केला जातो. यामुळे ओबीसी समाजाची जनगणना करावी, पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे. या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विरोध केले जाईल.निवेदन देताना ओबीसी जनमोर्चाचे राज्य कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार, संघटक पी. ए. कुंभार, माजी महापौर मारूतराव कातवरे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडे, माजी नगरसेवक सुजय पोतदार, सयाजी झुंजार, सरला पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार