शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

‘नकोशी’ना समाजातही मानसन्मान मिळेल

By admin | Updated: August 29, 2016 23:19 IST

प्रियदर्शनी मोरे : चौगुले महाविद्यालयात ‘नकोशीला देऊया नवी ओळख’ कार्यक्रम उत्साहात

कोतोली : पन्हाळ्यातील नकोशी आता विद्या, राजलक्ष्मी, दिव्यानी, ऐश्वर्या नावाने वावरणार असल्याने, त्यांना समाजातही मानसन्मान मिळेल, असे प्रतिपादन पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी केले. येथील चौगुले महाविद्यालयात ‘नकोशींना देऊया नवी ओळख’ हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष के. एस. चौगुले होते.मोरे म्हणाल्या, मुला-मुलींच्या गुणोत्तराच्या प्रमाणात पन्हाळा तालुका तळाला आहे. ते सुधारण्यासाठी लेक वाचवा अभियान सुरू आहे. त्यालाच ‘नकोशींना देऊया नवी ओळख’ या उपक्रमाची साथ मिळाली आहे. चौगुले महाविद्यालयाचे सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. आॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावण्याचे काम मुलींनीच केले आहे. या परिस्थितीतून मुलींनी ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी जन्मभूमीचे तसेच भारतीय संस्कृतीचे भान ठेवणे काळाची गरज आहे.महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम स्फूर्तीदायक असून, मुलींनी स्वत:बद्दल असणारी असुरक्षेची भावना दूर केली पाहिजे, असे प्रतिपादन कळे पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक मीना जगताप यांनी केले.स्फूर्ती, जिद्द, धाडस या त्रिवेणी संगमाआधारे मुलींना कर्तव्य सिद्ध करता येते. सध्या शिक्षणक्षेत्रातही मुलींची आघाडी आहे, असे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले यांनी सांगितले. यावेळी नकुशा साळोखे, नकुशा पाटील व नकुशा कांबळे यांना अनुक्रमे स्नेहल साळोखे, पूजा पाटील व नेहा कांबळे असे नामकरण केले. यानिमित्त मुलींना महाविद्यालयाच्यावतीने नवीन कपडे दिले. त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के. एस. चौगुले, सचिव शिवाजी पाटील-यवलूजकर, संचालक व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. अजय चौगुले, प्रशासन अधिकारी प्रवीण आंबेरकर, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, आदी उपस्थित होते.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. के. पावार यांनी, तर स्वागत प्रा. व्ही. पी. पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रा. उषा पवार यांनी, तर आभार प्रा. एस. जी. कांबळे यांनी मानले. (वार्ताहर)खर्च महाविद्यालय करणारपन्हाळा तालुक्यातील ज्या मुलींना नावे बदलायची आहेत, त्यांचा सर्व खर्च महाविद्यालयामार्फत करण्यात येणार आहे, तरी याबाबत प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.