शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Kolhapur: मनासारखी नोकरी मिळत नाही, नैराश्यातून खणीत उडी घेऊन अभियंत्याने संपवले जीवन

By उद्धव गोडसे | Updated: October 31, 2023 15:25 IST

कष्टातून इंजिनिअर बनवलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आईला मानसिक धक्का बसला.

कोल्हापूर : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने मेकॅनिकल इंजिनिअर तरुणाने रंकाळा परिसरातील खणीत उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ३१) सकाळी उघडकीस आला. शिवम अनिल सावंत (वय २६, रा. जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. कष्टातून इंजिनिअर बनवलेल्या मुलाने आत्महत्या केल्याने त्याच्या आईला मानसिक धक्का बसला.याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम सावंत हा संभाजीनगर येथे आई, भाऊ, बहीण आणि आजीसोबत राहत होता. त्याच्या वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, आईने मोठ्या कष्टातून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला शिवम एका खासगी कंपनीत काम करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो नवीन नोकरीच्या शोधात होता. मात्र, मनासारखी नोकरी मिळत नसल्याने तो निराश होता. सोमवारी (दि. ३०) सायंकाळी तो घरातून बेपत्ता झाला. मंगळवारी सकाळी रंकाळा परिसरातील खणीत त्याचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर