शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

उद्धव ठाकरेंचं भाषण दसऱ्याचं नसून शिमग्याचं, चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

By महेश गलांडे | Published: October 27, 2020 4:39 PM

दसरा मेळाव्याचं भाषण हे दसऱ्याचं नसून शिमग्याचं होतं. शिमग्याला जसं आपण विरोधकांच्या नावानं बोंब मारली जाते, तसंच हे भाषण होतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जबरी टीका केली.

ठळक मुद्देदसरा मेळाव्याचं भाषण हे दसऱ्याचं नसून शिमग्याचं होतं. शिमग्याला जसं आपण विरोधकांच्या नावानं बोंब मारली जाते, तसंच हे भाषण होतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जबरी टीका केली.

नवी दिल्ली - मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. न्यायालयानं आज मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी काही काळासाठी तहकूब केली होती. मात्र, त्यानंतर ती चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली. खंडपीठासमोरील आजच्या सुनावणीला सरकारी वकील मुकूल रोहतगी गैरहजर होते. यावरुन, सरकार अजिबात गंभीर नसल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरुनही पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण चालवले. 

दसरा मेळाव्याचं भाषण हे दसऱ्याचं नसून शिमग्याचं होतं. शिमग्याला जसं आपण विरोधकांच्या नावानं बोंब मारली जाते, तसंच हे भाषण होतं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर जबरी टीका केली. उद्धव ठाकरेंची ती परंपरा नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ते शोभत नाही. केवळ मुख्यमंत्र्याचा मास्क काढून मी बोलतोय, असं म्हणून जमत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणात, मराठा आरक्षणावर, राज्यातील कोरोना परिस्थितीवर किंवा राज्यातील शिक्षणासंदर्भात काहीही भाष्य केलं नाही. राज्यातील शाळा कधी सुरू होतील, यावरही ते काहीही बोलले नाहीत. शाळा सुरू होण्याबद्दल काहीच माहिती नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे, असेही पाटील यांनी म्हटलं. तुम्ही ज्याप्रकरची शिवराळ भाषा वापरली, रावसाहेब दानवे, राज्यापालांपासून ते मोदींपर्यंत टीका केली, गोमुत्र, शेण, हिंदुत्व यावर बोलले, मग एखाद्याला चापट मारल्यावर दुसरा गाल पुढे करण्याइतकी आमची परिस्थिती नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

मुख्यमंत्र्यांबद्दल खासदार नारायणे राणेंनी एकेरी भाषा वापरुन टीका केली, तसेच जी भाषा वापरली ते चुकीचे नाही काय, या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्र्यांनी वापरेली भाषा योग्य होती, ज्या भाषेत मुख्यमंत्री बोलेले त्याच भाषेत त्यांच्यावर टीका करण्यात आलीय, असे म्हणत पाटील यांनी नारायण राणेंचं समर्थन केलंय.  

मराठा आरक्षणावर सरकार गंभीर नाही

9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, तेव्हापासून आजतागायत सरकारने केलेले प्रयत्न संशयास्पद आहेत. अॅड. थोरात यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी लवकर चालवण्यासाठी कोर्टात मेन्शन केलं, पण सर्वोच्च न्यायालयानं ते फेटाळलं. त्यामुळे, गेल्या 47 दिवसांतील राज्य सरकारच्या कामाच्या अनुभवावरुन मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, मराठा आरक्षणाच्या स्थगितीच्या निर्णयाविरुद्ध केलेल्या अर्जावर सुनावणी आज होणार होती. मात्र, या सुनावणीसाठी दिल्लीत ना सरकारी वकील हजर होते, ना राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण दिसले, असे पाटील यांनी म्हटले.    

विनोद पाटील यांचीही सरकारवर नाराजी

''मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीला राज्य सरकारचे वकील मुकूल रोहतगी अनुपस्थित राहिले. राज्य सरकारची ही चूक झाली आहे. राज्य सरकारने वकिलांना सूचना करायला हवी होती. कदाचित सरकारला गांभीर्य नसेल, म्हणूनच सरकारचे वकील अनुपस्थित होते. आमचे वकील सुनावणीला हजरं होते. त्यामुळे, आमच्या वकिलांनीच सरकारची बाजू ऐकण्याची विनंती खंडपीठाला केला. त्यामुळे, न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली. मात्र, सरकार अद्यापही गंभीर नसल्याचे दिसत आहे, असा आरोप मराठा आरक्षणातील प्रमुख याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकिलांची अनुपस्थिती असल्याने सुनावणी पुढे ढकलली आहे. आजचं प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे लागलेलं आहे. हे प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे गेले असून त्यासाठी न्यायमूर्तीचं खंडपीठ गठीत करण्यात आलं नाही. म्हणून, ही सुनावणी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे घेण्यात आली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर हे प्रकरणासाठी 5 न्यायमूर्तीचं खंडपठ गठीत होण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असेही विनोद पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले. 

संभाजीराजेंची सरकारला विनंतीवजा सूचना

मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या हे, मी सरकारला नेहमी सांगितलं आहे. जे कोणी सामान्य विभागाचे जे कोणी सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणं गरजेचे आहे. त्यामुळे सरकाराला माझी विनंती पूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा, अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे 'टीव्ही ९ मराठी' या वृत्तावाहिनीशी बोलताना म्हणाले की, मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहेत.  मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले

वकिलाची अनुपस्थिती, संभाजीराजेंची नाराजी

सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्देव आहे. गंभीर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जिथे कुठे असतील, त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे, अशं संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या विनंतीनंतर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारनं आणखी जोर लावायला पाहिजे म्हणजे काय करायचं?, असा सवाल उपस्थित केला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे