शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱ्यावर, तोफा धडाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 18:43 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देयुतीतील बेबनावावर काय बोलणार? याकडे राजकीय वर्तुळाच्या नजराशिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ ठिकठिकाणी होणार सभा

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या तोफा धडाडणार आहेत. शिरोळ, चंदगड, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांत प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला शिवसेनेचे उमेदवार उपस्थित असले तरी पक्षाचा एकही झेंडा नव्हता. यावरून झालेल्या युतीतील बेबनावावर ते काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.उद्धव ठाकरे हे मंगळवारी जिल्हा दौऱ्यावर असून, ते शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. त्यामध्ये शिरोळचे शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी २ वाजता शिवाजी तख्त (ता. शिरोळ) येथे, त्यानंतर ३ वाजता चंदगडचे शिवसेनेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या प्रचारासाठी हलकर्णी फाटा (ता. चंदगड)मध्ये, दुपारी ४ वाजता शाहूवाडीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्या प्रचारासाठी छ. शिवाजी महाराज महाविद्यालय पटांगण, सरूड (ता. शाहूवाडी) येथे, तर सायंकाळी ६ वाजता कोल्हापूर शहरात उत्तरचे शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी पेटाळा (शिवाजी पेठ) येथे सभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा मुक्काम राहणार असून, दुसºया दिवशी सकाळी ते कोकणकडे रवाना होणार आहेत.दरम्यान, सभांच्या तयारीसाठी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांनी तयारीसंदर्भातील माहिती दिली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर