शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांना नरके पिता-पुत्र भेटले, चेतन नरके लोकसभेसाठी शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 14:04 IST

शिवसेना पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक

कोल्हापूर : लोकसभेसाठी कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरूण नरके, संदीप नरके यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. लोकसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरे आठ दिवसात निर्णय घेतली अशी माहिती अरुण नरके यांनी दिली.‘मातोश्री’वरील या बैठकीसाठी नरके यांना शनिवारी निरोप आला होता. त्यानुसार हे तिघेही सकाळीच मुंबईला रवाना झाले होते. या बैठकीला खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, अजित देसाई हे देखील उपस्थित होते. लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीकडून कोण रिंगणात उतरणार याची मोठी उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्यात होती. नरके यांनी वर्षभरापूर्वीच आपली इच्छा जाहीर करून त्यांनी मतदारसंघाचा एक दौराही काही दिवसांपूर्वी पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर याआधीही चेतन नरके यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. ‘मातोश्री’वर नरके कुटुंबीय आणि ठाकरे यांच्यामध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. यावेळी एकूणच जिल्ह्याचे राजकारण, सध्याची स्थिती याची चर्चा झाल्याचे समजते.चेतन नरके हे शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक आहेत. शिवसेनेने गेल्या निवडणुकीत ज्या जागा लढवल्या होत्या, त्या मतदार संघातील उमेदवारांची निश्चिती आठवड्यात करून त्यांना काम सुरू करण्यास सांगण्यात येणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.शिवसेना पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठकयेत्या आठवड्याभरात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ‘माताेश्री’वर होणार असून यावेळी नरके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सांगण्यात आले. या बैठकीला जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील शिंत्रे, विजय देवणे यांना बोलावण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना