शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या तयारीला लागा : ठाकरे : ‘मातोश्री’वर मंडलिक, धैर्यशील माने यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:25 IST

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी सहकुटुंब ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही खासदारांचे स्वागत केले, तर त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही खासदारांचे औक्षण केले.

ठळक मुद्दे ‘मातोश्री’वर संजय मंडलिक, धैर्यशील माने यांची भेट नूतन खासदारांचे रश्मी ठाकरे यांच्याकडून औक्षण

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी सोमवारी सहकुटुंब ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी दोन्ही खासदारांचे स्वागत केले, तर त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही खासदारांचे औक्षण केले.

यावेळी आता लोकसभेप्रमाणे विधानसभेच्याही तयारीला लागा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांना येथे केले. पक्षाच्या सर्वच खासदारांना घेऊन लवकरच करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनाला येऊ, असेही त्यांनी सांगितले.शिवसेनेच्या कोल्हापूरसह हातकणंगले, मावळ, सिंधुदुर्ग, हिंगोली येथील खासदारांनी ‘मातोश्री’वर ठाकरे यांंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे खासदार प्रा. संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार स्वागत केले. रश्मी ठाकरे यांनी दोघांचेही औक्षण केले.

मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समर जाधव, निवेदिता माने, रश्मी ठाकरे, वेदांतिका माने उपस्थित होत्या.

मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचे औक्षण केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आदी उपस्थित होते.

यावेळी वैशाली संजय मंडलिक, माजी खासदार निवेदिता माने, वेदांतिका धैर्यशील माने, खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव, आदी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, कोल्हापूरवर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून देऊन येथील जनतेने पूर्ण करून विश्वास दाखविल्याबद्दल त्यांचे ऋण विसरू शकत नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईने ताकद दिली; त्यासाठी शिवसेनेच्या सर्वच्या सर्व खासदारांना घेऊन लवकरच अंबाबाईच्या दर्शनाला येऊ.

संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी दिली जाईल. त्यांच्यासह सर्व आमदार, पदाधिकाऱ्यांनी लोकसभेपाठोपाठ शिवसेनेला घवघवीत यश मिळविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे.

यावेळी समर जाधव, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील, नामदेव गिरी, सयाजी चव्हाण, सतीश मलमे, बाजीराव चव्हाण, मंगल चव्हाण, शुभांगी पोवार, हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते. मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी रश्मी ठाकरे, वैशाली मंडलिक उपस्थित होत्या.

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर