शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha2024: कोल्हापुरातील ठाकरे, शिंदेंच्या निष्ठावंतानी ठोकला मुंबईत तळ; कल्याण’, ‘दक्षिण मध्य मुंबई’ टार्गेट

By राजाराम लोंढे | Updated: May 18, 2024 13:42 IST

क्षीरसागर, संजय पवार, धैर्यशील मानेंवर मतदारसंघाची जबाबदारी 

राजाराम लोंढेकोल्हापूर : मुंबईसह व ठाणे, कल्याण मतदारसंघात शिंदेसेना व उद्धवसेनेची प्रतिष्ठा पणास लागल्याने तिथे जोडण्या लावण्यासाठी पक्षातील विश्वासू शिलेदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे तर शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेली पाच दिवस तळ ठाेकला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर मतदारसंघातील निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. लोकसभेच्या निकालावरच आगामी मुंबई महापालिकेचे गणित अवलंबून राहणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष ताकदीने मैदानात उतरले आहेत. उमेदवार निश्चितीपासून डाव-प्रतिडावाचे राजकारण रंगले आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर स्थानिक नेत्यांचे विभाजन झाले, पण मतदारांचे काय? याचा अंदाज दोन्ही नेत्यांना नसल्याने कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास तयार नाहीत.महाराष्ट्रातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील निष्ठावंत व जोडण्या यशस्वी करणारे नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार हे सध्या दक्षिण मध्य मुंबई व दक्षिण मुंबई या दोन मतदारसंघात प्रचारात सक्रिय आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार धैर्यशील माने यांच्यावर दक्षिण मध्य मुंबई, कल्याण, ठाण्यासह इतर दोन मतदारसंघाच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे.

उतराईसाठी..कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्यात सर्वाधिक काळ तळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात ठोकला होता. येथे बसून त्यांनी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यासाठी जोडण्या लावल्या होत्या. त्यामुळे धैर्यशील माने व राजेश क्षीरसागर यांनी मुंबईत तळ ठोकला.दादांच्याही जोडण्या..भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मुंबईत गेलेले दिसत नाहीत. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे मात्र तिथे प्रचारात सक्रिय आहेत.

कोणत्याही निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने बोलावण्याची वाट कशाला बघायची? ती तर आपली जबाबदारी असते. हे आम्ही शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो. - संजय पवार (उपनेते, उद्धवसेना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMumbaiमुंबईlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४