शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Kolhapur: चौघेजण आधी बनले आमदार, नंतर पोहोचले थेट लोकसभेत 

By विश्वास पाटील | Updated: April 22, 2024 16:54 IST

जयवंतराव आवळे परजिल्ह्यांतून निवडून येणारे एकमेव खासदार 

विश्वास पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत आतापर्यंत झालेल्या १७ निवडणुकांत आमदार झाल्यानंतर खासदार होण्याचे भाग्य चौघांना लाभले. त्यामध्ये उदयसिंहराव गायकवाड, सदाशिवराव मंडलिक, कल्लाप्पाण्णा आवाडे आणि राजू शेट्टी यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार होऊन लातूर राखीव मतदारसंघातून खासदार होण्याची संधी माजी खासदार जयवंतराव आवळे यांना मिळाली. परजिल्ह्यांतून निवडून येणारे ते तसे एकमेव खासदार आहेत. उदयसिंहराव गायकवाड हे १९७२ ला शाहूवाडी मतदारसंघातून नवकाँग्रेसमधून आमदार होते. त्या निवडणुकीत त्यांना एकूण मते ३६ हजार ९५३ पडली; परंतु त्यातील त्यांचे मताधिक्य होते; तब्बल २४ हजार ७०९. त्याच वर्षी सदाशिवराव मंडलिक कागलमधून अपक्ष म्हणून पहिल्यांदा १६२४ मतांनी आमदार झाले. गायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८० च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४ च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून विधानसभेला निवडून आले.

आमदार झाले; परंतु लोकसभा नाही..विधानसभा लढवली त्यात यश मिळाले, आमदार म्हणूनही कारकिर्द गाजवली. उत्तम प्रतिमा, चांगले चारित्र्य असे सगळे पाठीशी असतानाही लोकसभेला मात्र त्यांना गुलाल मिळाला नाही, असेही काहीच्या बाबतीत घडले. त्यामध्ये शेका पक्षाचे चारित्र्यवान आमदार त्र्यंबक सीताराम कारखानीस, प्रा. एन. डी. पाटील, म्हसव्याचे काकासाहेब देसाई, जनता दलाचे लढाऊ नेते शंकर धोंडी पाटील, श्रीपतराव शिंदे, गोविंदराव कलिकते, के. एल. मलाबादे, अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, विक्रमसिंह घाटगे, संपतराव पवार यांचा समावेश होतो.

खासदार झाले; परंतु विधानसभा नाहीखासदार झाले; परंतु ज्यांना विधानसभेला लोकांनी निवडून दिले नाही, असेही काहींच्या बाबतीत घडले. त्यामध्ये एस. के. डिगे हे अगोदर करवीरमधून विधानसभेला पराभूत झाले आणि पुढच्याच १९५७ च्या निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून खासदार झाले. खासदार संजय मंडलिक यांनी २००९ ला कागल मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याच निवडणुकीत धनंजय महाडिक यांनीही कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली; परंतु त्यांना यश मिळाले नाही. पुढे महाडिक २०१४ ला, तर मंडलिक २०१९ ला खासदार झाले. आता महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत; तर मंडलिक नव्याने लोकसभेच्या रिंगणात आहेत.

दोन्हींकडे गुलाल नाहीराजकीय क्षेत्रात काम केले, समाजाच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला; परंतु तरीही जनतेने विधानसभा व लोकसभेलाही गुलाल लावला नाही, असेही अनेकांच्या बाबतीत घडले. त्यामध्ये ‘शेतकरी कामगार पक्षाची मुलुखमैदान तोफ’ अशी प्रतिमा असलेले प्रा. विष्णुपंत इंगवले, विजय देवणे, शिवसेनेचे पुंडलिक जाधव यांचा समावेश होतो.

राजू शेट्टी २००४ मध्ये झाले आमदारगायकवाड १९७८ च्या निवडणुकीतही आमदार होते. कल्लाप्पाण्णा आवाडे हे १९८०च्या निवडणुकीत अर्स काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले होते. शिरोळ मतदारसंघातून २००४च्या निवडणुकीत राजू शेट्टी अपक्ष म्हणून आमदार झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४