शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गवारेड्याने दुचाकीला दिली धडक, बुरडे येथील दोन युवक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 17:46 IST

आजरा : गवारेड्याने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत बुरुडे तालुका आजरा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. ऋषिकेश शामराव कांबळे (वय-२४) ...

आजरा : गवारेड्याने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत बुरुडे तालुका आजरा येथील दोन युवक गंभीर जखमी झाले. ऋषिकेश शामराव कांबळे (वय-२४) व दिनकर लक्ष्मण कांबळे ( ३४) अशी जखमींची नावे आहेत. उचंगी धरणावर रोजंदारीने कामासाठी जात असताना सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ऋषिकेश व दिनकर हे दोघे उचंगी धरणावर रोजंदारी कामगार म्हणून कामावर आहेत. ते सकाळी सहाच्या पाळीला धरण स्थळाकडे निघाले होते. उचंगी फाट्याजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर आलेल्या गवारेड्याने यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. धडकेत दोघांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीचे मोठे नुकसान झाले.अपघातानंतर ऋषिकेशने धरण स्थळावर फोन करुन गवारेड्याने धडक दिल्याचे सांगितले. तातडीने दोघांना आजरा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर  उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल केले आहे. वनविभागाला याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल एस. के. नीळकंठ, वनरक्षक एस. व्ही.चाळके यांनी भेट देऊन पंचनामा केला. दोघांच्याही औषधोपचाराचा खर्च देणार असल्याचे यावेळी वनपाल एस. के. नीळकंठ यांनी सांगितले.लाळखुरकतमुळे हुडे येथे गव्याचा मृत्यूदरम्यान उचंगीशेजारी असणाऱ्या हुडे येथे रामचंद्र देसाई यांच्या रांगी नावाच्या शेतात लाळ खुरकत आजारामुळे अशक्त झालेल्या गवारेड्या मृत आढळून आला. त्याचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद पाटील यांनी करून त्याला त्याच ठिकाणी दहन  करण्यात आले आहे अशीही माहिती वनपाल एस.के. निळकंठ यांनी दिली.

(छाया - सदाशिव मोरे)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर