शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

कोल्हापूर परिक्षेत्रात दोन वर्षांत ५९५ गुंडांना मोक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 18:16 IST

गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.

ठळक मुद्देसंघटित गुन्हेगारी काढली मोडून गुंडांच्या ८२ टोळ्या गारद; पोलीस अधिकाऱ्यांनी ठेवला दबदबा

तानाजी पोवारकोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत कोल्हापूर परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस दलाने मोठ्या शर्थीने प्रयत्न केले. खून, दरोडे, हाणामारी असे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांच्या मुसक्या आवळल्या.

अवघ्या दोन वर्षांतच ८२ टोळ्यांतील ५९५ गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई करत त्यांना गजाआड डांबले. त्यामुळे परिक्षेत्रातील गुन्हेगारीला बऱ्यापैकी आळा बसला, पण काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा गुन्हेगार डोके वर काढू लागले आहेत, त्यांना पुन्हा ठेचण्याची गरज निर्माण झाली आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या कोल्हापूर परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यामध्ये पाचही पोलीस अधीक्षकांनी आपली कामगिरी चोख बजावत गुन्हेगारी विश्वावर वचक ठेवला. तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांचेही मोठे योगदान लाभले.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १६ टोळ्यांतील १४५ जणांवर तर तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील याच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणमधील ३५ टोळ्यांतील २४० जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली. ही दोन वर्षे परिक्षेत्रातील गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरली. गेल्या चार-पाच महिन्यांत कोरोना संकटामुळे मात्र नव्या टोळ्यांवर कारवाई करण्यास पोलीस खात्याला वेळच मिळाला नाही.कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सांगलीचे अधीक्षक डॉ. सोहेल शर्मा, पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाटील, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साताराचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारांवर चांगलाचा जरब ठेवला. त्यांच्या बदल्यांच्या तोंडावर गेले वर्षभर शांत राहिलेले गुन्हेगार आता पुन्हा आपले बस्तान बसविण्याच्या प्रयत्नांत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ हे वर्ष गुंडांसाठी ठरले कर्दनकाळकोल्हापूर जिल्ह्यात २०१९ मध्ये १३ टोळ्यातील १२७ गुंडांच्या मुसक्या आवळल्या. इचलकरंजीतील तेलनाडे बंधूवर दुसऱ्यांदा मोक्कांतर्गत कारवाई केली, पण ते बंधू अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहेत. अनेक पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहीत असल्याची चर्चा आहे, पण खाल्या मिठाला जागल्याप्रमाणे काहीजण गुपचूप आपली भूमिका बजावत असल्याचेही समजते.

शिवाय २०२० मध्ये जानेवारी महिन्यात राजस्थानच्या बिष्णोई गुंडांच्या टोळीचा थरारक पाठलाग करुन त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यानजीक पकडले. त्यावेळी पोलीस व गुंडांच्यात गोळीबारही झाला. त्या टोळीतील तिघांवर मोकांतर्गत करवाई केली.जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० कोल्हापूर परीक्षेत्रातील गुन्हेगारीचा मोका कारवाईचा आलेख:जिल्हा :  टोळी संख्या - आरोपींची संख्या१) कोल्हापूर :  १६     - १४५२) सांगली :     १०     - ७३३) सातारा :     १४     - ८८४) सोलापूर ग्रामीण : ७ - ४९५ ) पुणे ग्रामीण : ३५ - २४०एकूण : ८२ - ५९५कोल्हापूर जिल्हयात गेल्या पाच वर्षांतील मोक्का कारवाईवर्षे : टोळी - आरोपी संख्या

  • २०१५ : ० १ - ०४
  • २०१६ : ० ३ - ३०
  • २०१७ : ० ३ - १४
  • २०१८ : १८ - ११५
  • २०१९ : १३ - १२७
  • २०२० : ० ३ - १८ (ऑगष्ट अखेर)
टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर