शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांच्या चिमुकल्याने कोंडून घेतलं, दार तोडणंही कठीण झालं, अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 19:01 IST

चिमुकला रांगत रांगत दरवाजाजवळ आला अन् दरवाजाला आतून कडी लागली. दरवाजा बंद झाला. आजी घरात जाण्यासाठी आली असता दरवाज्याला आतून कडी लावल्याने आजीबाई थक्क झाल्या. बाळ अडकल्याने आजीची पाचावर धारण झाली.

रवींद्र येसादे

महागोंड :  वेळ दुपारची, आजीबाई अंगणात कपडे वाळत घालत होत्या. घरात दोन वर्षाचा चिमुकला. चिमुकला रांगत रांगत दरवाजाजवळ आला अन् दरवाजाला आतून कडी लागली. दरवाजा बंद झाला. आजी घरात जाण्यासाठी आली असता दरवाज्याला आतून कडी लावल्याने आजीबाई थक्क झाल्या. बाळ अडकल्याने आजीची पाचावर धारण झाली. मात्र, दोन तासाच्या प्रयत्नानंतर या चिमुकल्याची सुखरुप सुटका झाली. अर्णव शिवपुत्र हिडदुग्गी असे या चिमुकल्याचे नाव आहे.उत्तूर येथील लक्ष्मी देवालयाजवळील जुना गारगोटी - उत्तूर येथे राधाकृष्ण पतसंस्थेजवळ हिडदुगी कुंटुंबीय भाडोत्री घरात राहतात. वडील शेताकडे तर आई ही ग्रामसेविका असल्याने ते वझरे येथे गेल्या होत्या. घरात फक्त आजीबाई आणि हा दोन वर्षांचा अर्णव. आजीबाई नातवांचा  सांभाळ करत होत्या.दुपारी बाराच्या सुमारास त्या कपडे वाळत घालण्यासाठी रस्त्याच्या पलिकडे गेल्या. अर्णव पहिल्या खोलीत खेळत होता. खेळता खेळता उभा राहिला भिंतीचा आधार घेत दरवाजापाशी पोहचला. अचानक कडी लागल्याने दरवाजा आतून बंद झाला.  एवढ्यात आजीबाई घरी आल्या तर दरवाजा आतून बंद होता. आजी ओरडू लागली मात्र अर्णवला नीट बोलता येत नसल्याने प्रतिसाद  आला नाही. घराला एकच दरवाजा असल्याने अर्णवची सुटका कशी होणार या चिंतेत आजीबाई होत्या.

खिडकी जवळ येवून बोलवू लागल्या. मात्र सुटका कशी होणार या चिंतेत अजीबाई होत्या. बघता बघता आजींनी शेजाऱ्यांना गोळा केले. अर्णव खेळात मग्न होता. त्याच्या शेजारी औषधाच्या बाटल्या होत्या. नकळत औषध प्यायला तर विपरीत घडायला नको म्हणून दरवाजा तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अर्णव  रांगत रांगत पुन्हा दरवाजाकडे येत होता. त्यामुळे दरवाजा तोडणे अशक्य होते. शेवटी अर्णव रांगेत खिडकीजवळ आला ग्रामस्थांनी त्याला बोलण्यात मग्न  केले. तेवढ्यात कटावणीच्या साह्याने दरवाजा तोडून अलगद बाजूला केला. अन् दोन तासानंतर अथक प्रयत्नानंतर अखेर अर्णवची सुटका झाली आणि आजीबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर