शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Kolhapur: अंबाबाई मंदिरातून दोन महिलांच्या पर्स लंपास, सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू 

By उद्धव गोडसे | Updated: January 29, 2024 12:12 IST

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार रविवारी (दि. ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या. हा प्रकार रविवारी (दि. २८) सायंकाळी आणि रात्री घडला. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल झाल्या असून, मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू आहे.अंबाबाई मंदिरात दर्शन घेणा-या भाविकांच्या पर्स, दागिने, पाकिटे लंपास करणारे काही चोरटे सक्रीय होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे कर्मचारी आणि साध्या वेशातील पोलिसांनी संशयितांवर नजर ठेवून कारवाया केल्यानंतर हे प्रकार कमी झाले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुनीता सुखदेव ताटे (वय ३८, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) या कासव चौकातून मुखदर्शन घेत असता, त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली. महिला बचत गटाकडून जमा झालेले ३५ हजार रुपये ताटे यांनी पर्समध्ये ठेवले होते. दुस-या घटनेत स्नेहल संजय पाटील (वय ५९, रा. लॉ कॉलेज रोड, पुणे) या कासव चौकातून दर्शन घेताना त्यांच्या पर्सची चोरी झाली. पर्समध्ये पाच ग्रॅमच्या सोन्याच्या कुड्या आणि ७ हजार ५०० रुपयांची रोकड होती. दोन्ही महिलांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर