गतवेळी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेते बुध्दिराज पाटील यांच्या गटाने सात जागा जिंकून सत्ता प्राप्त केली होती. यावेळी मात्र काँग्रेस स्थानिक आघाडीमध्ये इतर गटातील स्थानिक नेते एकवटले आहेत .काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सज्जन पाटील, यशवंत बँकेचे माजी संचालक सर्जेराव हुजरे, माजी सरपंच पंडित पाटील, बाजीराव जरग, पांडुरंग पाटील आदि स्थानिक नेते एकत्र आले आहेत, तर विरोधी गटाच्या आघाडीचे नेतृत्व बुध्दिराज पाटील निवृत्ती पाटील करीत आहेत. गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सज्जन पाटील यांची बिनविरोध निवड झाली, तर एकूण चार प्रभागात रंगतदार दुरंगी लढत होत असून ग्रामपंचायतीची सत्ता प्राप्त करण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे .
महे गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न भंगल्याने अखेरच्याक्षणी दुरंगी लढतीच्या आघाड्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. महे गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे ग्रामीण परिसराच्या नजरा लागल्या आहेत.
एकूण प्रभाग संख्या = ४
एकूण जागा = ११
एकूण मतदार = २४३२